आयपीएलमध्ये आतापर्यंत 27 गोलंदाजांनी घेतल्यात एका डावात 5 विकेट, पाहा संपूर्ण यादी
IPL 2022 Marathi News : हसरंगाने हैदराबादविरोधात चार षटकात 18 धावांच्या मोबदल्यात पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला. यंदाच्या हंगामात एकाच डावात गोलंदाजाने पाच विकेट घेण्याची ही तिसरी वेळ ...
Wanindu Hasaranga five Wicket : वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात आरसीबीने हैदराबादचा 67 धावांनी पराभव केला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करत 192 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरदाखल मैदानात उतरणाऱ्या हैदराबादचा संघ वानंदु हसरंगाच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. हसरंगाच्या फिरकीपुढे हैदराबादचा डाव 125 धावांत संपुष्टात आला. हसरंगाने हैदराबादविरोधात चार षटकात 18 धावांच्या मोबदल्यात पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला.
यंदाच्या हंगामात हसरंगाआधी दोन गोलंदाजांनी एकाच डावात पाच विकेट घेण्याचा पराक्रम केलाय. यजुवेंद्र चहलने कोलकाताविरोधात ब्रेबॉन स्टेडिअमवर तर उमरान मलिकने गुजरातविरोधात पाच विकेट घेण्याचा पराक्रम केलाय. चहलने चार षटकात 40 धावा देत पाच विकेट घेतल्या तर उमरान मलिकने 25 धावा खर्च करत पाच विकेट घेतल्या. आयपीएलच्या इतिहसात 27 गोलंदाजांनी एका डावात पाच विकेट घेण्याचा भीमपराक्रम केलाय.
आयपीएलमध्ये एका डावत पाच विकेट घेणारे गोलंदाज-
सोहेल तनवीर : 2008- चेन्नई सुपर किंग्स विरोधात
लक्ष्मीपती बालाजी: 2008- किंग्स 11 पंजाब विरोधात
अमित मिश्रा: 2008- डेक्कन चार्जर्स विरोधात
अनिल कुंबळे: 2009- राजस्थान रॉयल्स विरोधात
लसिथ मलिंगा: 2011- दिल्ली डेयरडेविल्स विरोधात
हरभजन सिंह: 2011- चेन्नई सुपर किंग्स विरोधात
ईशांत शर्मा: 2011- कोच्चि टस्कर्स विरोधात
मुनाफ पटेल: 2011- किंग्स 11 पंजाब विरोधात
रवींद्र जडेजा: 2012- डेक्कन चार्जर्स विरोधात
दिमित्री मस्कारेनहास: 2012- पुणे वॉरियर्स विरोधात
सुनील नरेन: 2012- किंग्स 11 पंजाब विरोधात
जेम्स फॉक्नर: 2013- सनराइजर्स हैदराबाद विरोधात
जयदेव उनादकट: 2013- दिल्ली डेयरडेविल्स विरोधात
जेम्स फॉक्नर: 2013- सनराइजर्स हैदराबाद विरोधात
एडम जम्पा: 2016- सनराइजर्स हैदराबाद विरोधात
अँड्रयू टाई: 2017- रायजिंग पुणे सुपरजाइंट्स विरोधात
भुवनेश्वर कुमार: 2017- किंग्स 11 पंजाब विरोधात
जयदेव उनादकट: 2017- सनराइजर्स हैदराबाद विरोधात
अंकित राजपूत: 2018- सनराइजर्स हैदराबाद विरोधात
अल्जारी जोसेफ: 2019- सनराइजर्स हैदराबाद विरोधात
वरुण चक्रवर्ती: 2020- दिल्ली कॅपिटल्स विरोधात
हर्षल पटेल: 2021- मुंबई इंडियन्स विरोधात
आंद्रे रसेल: 2021- मुंबई इंडियन्स विरोधात
अर्शदीप सिंह: 2021- राजस्थान रॉयल्स विरोधात
युजवेंद्र चहल: 2022- कोलकाता नाइटराइडर्स विरोधात
उमरान मलिक: 2022- गुजरात टाइटन्स विरोधात
वानंदु हसरंगा: 2022- सनराइजर्स हैदराबादविरोधात