BCCI on IPL Impact Player Rule: 'Impact Player' चे भविष्य काय असेल?; टी-20 विश्वचषकानंतर निर्णय घेणार, रोहितनेही केलं होतं भाष्य
BCCI on IPL Impact Player Rule: 'इम्पॅक्ट प्लेयर' च्या नियमाबाबत खेळाडू, प्रशिक्षक आणि विश्लेषकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या.
BCCI on IPL Impact Player Rule: इंडियन प्रीमियर लीगमध्ये 2023 एक नियम जोडला गेला, ज्याला 'इम्पॅक्ट प्लेयर' नियम (Impact Player Rule) असे नाव देण्यात आले. मात्र आता बीसीसीआय 'इम्पॅक्ट प्लेयर'बाबत विचार करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
'इम्पॅक्ट प्लेयर' च्या नियमाबाबत खेळाडू, प्रशिक्षक आणि विश्लेषकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. यावर आता बीसीसीआयचे सचिन जय शहा यांनीही भाष्य केलं आहे. चर्चांनंतर 'इम्पॅक्ट प्लेयर'बाबत निर्णय घेतला जाईल. या नियमामुळे दोन ज्यादाच्या भारतीय खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवता येते. आम्ही इम्पॅक्ट प्लेयरचा नियम पुढे कायम ठेवायचा की नाही, हे ठरवण्यापूर्वी भागधारक, फ्रँचायजी आणि ब्राँडकास्टर यांच्याशी चर्चा करु, तो नियम कायमसाठी नाही, असं जय शहा यांनी सांगितले.
'इम्पॅक्ट प्लेअर' नियमाची चर्चा का होत आहे?
'टेस्ट केस' म्हणून आणलेल्या 'इम्पॅक्ट प्लेयर' नियमाचा सध्याच्या आयपीएलवर खूप परिणाम झाला आहे. या मोसमात आतापर्यंत संघांनी 8 वेळा 250 धावांचा टप्पा ओलांडला आहे. अनेक खेळाडू, प्रशिक्षक आणि तज्ञांचा असा विश्वास आहे की हा नियम गोलंदाजांसाठी हानिकारक आहे, कारण यामुळे संघांना लांब फलंदाजी करण्याची संधी मिळते.
काय म्हणाले जय शहा?
जय शाह म्हणाले की, यावर अंतिम निर्णय सर्व संबंधित पक्षांसोबत बैठकीनंतर घेतला जाईल, जो कदाचित टी-20 विश्वचषकानंतर होईल. "खेळाडूंना वाटत असेल की हा नियम योग्य नाही, तर आम्ही त्याबद्दल बोलू. आतापर्यंत कोणीही तक्रार केलेली नाही. आयपीएल आणि वर्ल्ड कपनंतर आम्ही भेटून निर्णय घेऊ. कायमस्वरूपी नाही, असा कोणताही नियम नाही, किंवा आम्ही ते रद्द करू असे मी म्हणत नाही."
रोहित शर्मा काय म्हणाला होता?
याबाबत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, "हा नियम अष्टपैलू खेळाडूंसाठी चांगला नाही, कारण त्यांना कमी गोलंदाजी करण्याची संधी मिळते. मात्र, या नियमामुळे दोन भारतीय खेळाडूंना अतिरिक्त खेळण्याची संधी मिळते, ही सकारात्मक बाब आहे."
'इम्पॅक्ट प्लेयर' नियम काय आहे?
इम्पॅक्ट प्लेयरच्या नियमानुसार, नाणेफेकीनंतर, प्रत्येक संघाला त्यांच्या प्लेइंग इलेव्हन व्यतिरिक्त जास्तीत जास्त पाच पर्यायी खेळाडूंची नावे देण्याची परवानगी आहे. खेळादरम्यान कोणत्याही वेळी, त्यापैकी एक – ज्याला इम्पॅक्ट प्लेयर म्हणतात – प्लेइंग इलेव्हनमधील कोणत्याही सदस्याची जागा घेऊ शकतो.