एक्स्प्लोर

#IPL final मध्ये मुंबईची बाजी, पुण्यावर एका धावेने विजय

हैदराबाद : आयपीएलच्या दहाव्या मोसमाची ट्रॉफी मुंबई इंडियन्सने उंचावली आहे. रायझिंग पुणे सुपरजायंट्सवर अवघ्या एका धावेने मुंबईने विजय मिळवला. आयपीएलमध्ये मुंबईने तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं आहे. मुंबई इंडियन्सने विजयासाठी दिलेल्या 130 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पुण्याने चांगली सुरुवात केली होती. मात्र अखेरच्या क्षणी पुण्याचा डाव गडगडला. पुणे संघ 6 बाद 128 धावांपर्यंतच मजल मारु शकला. मुंबईच्या या थरारक विजयाचा शिल्पकार ठरला तो डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन. पुण्याला विजयासाठी अखेरच्या षटकांत 11 धावांची गरज असताना, मिचेल जॉन्सननं मनोज तिवारी आणि स्टीव्ह स्मिथच्या विकेट्ससह नऊच धावा मोजून मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्याआधी या सामन्यात पुण्याच्या गोलंदाजांनी मुंबईला 20 षटकांत आठ बाद 129 धावांत रोखलं होतं. त्यामुळे पुण्यासमोर विजयासाठी केवळ 130 धावांचंच आव्हान होतं. पण मुंबईच्या गोलंदाजांनी पुण्याला 20 षटकांत पाच बाद 128 धावांत रोखून आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा सरस कामगिरी बजावली. आयपीएलच्या दहा मोसमातील विजेते 2008: RR 2009: DC 2010: CSK 2011: CSK 2012: KKR 2013: MI 2014: KKR 2015: MI 2016: SRH 2017: MI #IPLfinal : #RPSvMI : आयपीएलच्या दहाव्या मोसमात मुंबई इंडियन्सचा विजय, आयपीएलमध्ये मुंबईला तिसऱ्यांदा जेतेपद #IPLfinal : #RPSvMI : पुण्याचं स्वप्न भंगलं, मुंबई इंडियन्सचा रायझिंग पुणे सुपरजायंट्सवर एका धावेने विजय #IPL final मध्ये मुंबईची बाजी, पुण्यावर एका धावेने विजय #IPLfinal : #RPSvMI : पुणे 126/5, विजयासाठी पुण्याला एका चेंडूत 4 धावांची गरज #IPLfinal : #RPSvMI : पुणे 124/5, विजयासाठी पुण्याला 2 चेंडूत 6 धावांची गरज #IPLfinal : #RPSvMI : पुण्याला मोठा धक्का, स्मिथ 51 धावांवर बाद, पुणे 123/5, विजयासाठी पुण्याला 3 चेंडूत 7 धावांची गरज #IPLfinal : #RPSvMI : पुण्याला चौथा धक्का, तिवारी बाद, विजयासाठी पुण्याला 4 चेंडूत 7 धावांची गरज #IPLfinal : #RPSvMI : विजयासाठी पुण्याला 6 चेंडूत 11 धावांची आवश्यकता, स्मिथचं शानदार अर्धशतक : 51*(49) #IPLfinal : #RPSvMI : विजयासाठी पुण्याला 7 चेंडूत 13 धावांची आवश्यकता, स्मिथ 49* (48), पुणे 3 बाद 117 धावांवर #IPLfinal : #RPSvMI : विजयासाठी पुण्याला 9 चेंडूत 20 धावांची आवश्यकता, स्मिथ 43* (47), पुणे 3 बाद 110 धावांवर #IPLfinal : #RPSvMI : विजयासाठी पुण्याला 12 चेंडूत 23 धावांची आवश्यकता, पुणे 3 बाद 107 धावांवर #IPLfinal : #RPSvMI : पुणे 3 बाद 100 धावांवर, विजयासाठी 20 चेंडूत 30 धावांची आवश्यकता #IPLfinal : #RPSvMI : पुण्याला मोठा धक्का, महेंद्र सिंह धोनी 10 धावांवर बाद ( गोलंदाजी :  बुमराह,  झेल : पटेल) dhoni #IPLfinal : #RPSvMI : पुण्याला विजयासाठी 24 चेंडूत 33 धावांची गरज, पुणे 2 बाद 97 धावांवर #IPLfinal : #RPSvMI : 36 चेंडूत पुण्याला विजयासाठी 53 धावांची आवश्यकता #IPLfinal : #RPSvMI : धोनी मैदानात, पुणे 2 बाद 71 धावांवर #IPLfinal : #RPSvMI : पुण्याला दुसरा धक्का, अजिंक्य रहाणे 44 धावांवर बाद ( गोलंदाजी :  जॉनसन,  झेल : पोलार्ड) ajinkya #IPLfinal : #RPSvMI : पुण्याला पहिला धक्का, राहुल त्रिपाठी 3 धावांवर बाद #IPLfinal : #RPSvMI : सलामीवीर अजिंक्य रहाणे मैदानात, पहिल्या षटकात पुणे 6/0 हैदराबाद : कृणाल पांड्याच्या 47 धावांच्या जोरावर मुंबईने विजयासाठी पुण्यासमोर 130 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबई इंडियन्सच्या 20 षटकात 8 बाद 129 धावा झाल्या. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात पार्थिव पटेल आणि लेण्डल सिमन्स ही मुंबईची सलामीवीर जोडी तिसऱ्याच षटकात माघारी परतली. अंबाती रायुडू आणि रोहित शर्मा यांनी गडगडणारा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रायुडू धावचीत झाल्यानंतर मुंबईची पुन्हा घसरगुंडी उडाली. रोहित 24, रायुडू 12, हार्दिक पांड्या 10, पोलार्ड 7, कर्ण शर्मा एका धावेवर बाद झाला. कृणाल पांड्याच्या 47 धावा वगळता मुंबईकडून फारसं कोणी चमकदार कामगिरी दाखवू शकलेलं नाही. पुण्याकडून जयदेव उनाडकटनं दोन आणि अॅडम झॅम्पानं दोन फलंदाजांना माघारी धाडलं. #IPL final मध्ये मुंबईची बाजी, पुण्यावर एका धावेने विजय #IPLfinal : #RPSvMI : मुंबई इंडियन्सच्या 20 षटकात 8 बाद 129 धावा, रायझिंग पुणे सुपरजायंट्ससमोर 130 धावांचं आव्हान #IPLfinal : #RPSvMI : शेवटच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सना आठवा धक्का, कृणाल पांड्या 47 धावांवर बाद #IPLfinal : #RPSvMI : मुंबई इंडियन्सना सातवा झटका, कर्ण शर्मा अवघ्या एका धावेवर रनआऊट #IPLfinal : #RPSvMI : मुंबई इंडियन्सला सहावा धक्का, हार्दिक पांड्या 10 धावांवर माघारी (एलबीडब्ल्यू) #IPL final मध्ये मुंबईची बाजी, पुण्यावर एका धावेने विजय #IPLfinal : #RPSvMI : मुंबईचा निम्मा संघ माघारी, रोहित पाठोपाठ पोलार्ड सात धावांवर बाद ( गोलंदाजी :  झॅम्पा,  झेल : तिवारी) #IPLfinal : #RPSvMI : मुंबई इंडियन्सला चौथा धक्का, कर्णधार रोहित शर्मा 24 धावांवर झेलबाद ( गोलंदाजी :  झॅम्पा,  झेल : शार्दुल ठाकूर) #IPL final मध्ये मुंबईची बाजी, पुण्यावर एका धावेने विजय #IPLfinal : #RPSvMI : मुंबई इंडियन्सच्या 3 बाद 50 धावा, रोहित शर्मा (23), कृणाल पांड्या (5) (9 षटक) #IPLfinal : #RPSvMI : मुंबईला तिसरा धक्का, अंबाती रायुडू रनआऊट (12) #IPLfinal : #RPSvMI : सहाव्या षटकात रोहित शर्माचे चार चौकार, मुंबई 2 बाद 32 धावांवर #IPLfinal : #RPSvMI : कर्णधार रोहित शर्मा मैदानात, मुंबईच्या 2 बाद 10 धावा #IPLfinal : #RPSvMI : मुंबईला दुसरा धक्का, सिमन्स 3 धावांवर बाद, मुंबई 2 बाद 8 धावांवर ( गोलंदाजी आणि झेल : उनाडकट) #IPLfinal : #RPSvMI : सिमन्सच्या साथीला रायुडू मैदानात, मुंबई 1 बाद 7 धावांवर #IPLfinal : #RPSvMI : मुंबई इंडियन्सला पहिला धक्का, पार्थिव पटेल 4 धावांवर बाद ( गोलंदाजी :  उनाडकट,  झेल : शार्दुल ठाकूर) #IPLfinal : #RPSvMI : महामुकाबल्याला सुरुवात, सिमन्स आणि पार्थिव पटेल मैदानात, दोन षटकात मुंबई #IPLfinal: आयपीएलच्या महामुकाबल्याला थोड्याच वेळात सुरुवात, मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजीचा निर्णय #IPL final मध्ये मुंबईची बाजी, पुण्यावर एका धावेने विजय हैदराबाद : आयपीएलच्या दहाव्या मोसमाच्या विजेतेपदासाठी पुन्हा महाराष्ट्र डर्बी पाहायला मिळणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवरच्या या लढाईत स्टीव्ह स्मिथच्या रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा सामना रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सशी होईल. पुण्याने क्वालिफायर वन सामन्यात मुंबईला हरवून आधीच फायनलमध्ये धडक मारली होती. तर मुंबईने क्वालिफायर टू सामन्यात कोलकात्याला हरवून फायनलचं तिकीट मिळवलं. मुंबई-पुण्याचा आयपीएलमधील इतिहास आयपीएलच्या इतिहासात पुण्याचा हा केवळ दुसराच मोसम आहे. पण दुसऱ्याच मोसमात पुण्याने फायनलमध्ये धडक मारून आपण आयपीएलचा रायझिंग सुपरजायंट असल्याचं दाखवून दिलं. मुंबईची आयपीएलची फायनल गाठण्याची ही चौथी वेळ आहे. मुंबईने याआधी 2010, 2013 आणि 2015 साली आयपीएलच्या फायनलचं तिकीट मिळवलं होतं. तसंच 2013 आणि 2015 साली मुंबईने आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नावही कोरलं. यंदाच्या मोसमातही मुंबईने सोळापैकी अकरा सामने जिंकून सर्वाधिक विजय साजरे करण्याचा पराक्रम गाजवला आहे. पण पुणेही मुंबईपेक्षा फार पिछाडीवर नाही. पुण्याच्या खात्यात पंधरापैकी दहा सामन्यांमध्ये विजय आहे. त्याच पुण्याने साखळीतल्या दोन आणि प्ले ऑफच्या क्वालिफायर सामन्यात मिळून मुंबईला तीनपैकी तिन्ही सामन्यांमध्ये हरवण्याची कामगिरी बजावली आहे. पुण्याकडून झालेल्या त्या तिन्ही पराभवांचा वचपा काढण्याची संधी मुंबई साधणार की मुंबईला हरवण्याची परंपरा पुणे कायम राखणार, याचीच उत्सुकता आयपीएलच्या चाहत्यांना लागली आहे. रॉकिंग मुंबईकर आयपीएलच्या विजेतेपदावर तिसऱ्यांदा नाव कोरायचं तर मुंबईच्या पार्थिव पटेल, कायरन पोलार्ड, रोहित शर्मा आणि लेण्डल सिमन्स या चार फलंदाजांना आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी बजावावी लागेल. तळाला हार्दिक आणि कृणाल पंड्याचा सातत्यपूर्ण वाटाही मुंबईच्या दृष्टीने मोलाचा ठरणार आहे. दमदार पुणेकर कर्णधार स्टीव्ह स्मिथ, राहुल त्रिपाठी, अजिंक्य रहाणे, मनोज तिवारी आणि महेंद्रसिंग धोनीचा फॉर्म पुण्याच्या दृष्टीने फलंदाजीत जमेची बाजू असेल. पण अष्टपैलू बेन स्टोक्स आणि लेग स्पिनर इम्रान ताहिर माघारी परतल्याने पुण्याच्या फौजेतला समतोलपणा मात्र कमी झाला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?

व्हिडीओ

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Embed widget