IPL 2020, KKRvsSRH | विजयाच्या शोधात असलेले कोलकाता-हैदराबाद आमने-सामने
कोलकाताकडे 8 गुण आहेत. तर, सनरायझर्स हैदराबादकडे 6 गुण आहेत. त्यामुळे प्ले ऑफ गाठण्यासाठी आता कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात स्पर्धा आहे.
![IPL 2020, KKRvsSRH | विजयाच्या शोधात असलेले कोलकाता-हैदराबाद आमने-सामने ipl 2020 KKR vs SRH ipl 2020 match between kolkata knight riders vs sunrisers hyderabad match preview IPL 2020, KKRvsSRH | विजयाच्या शोधात असलेले कोलकाता-हैदराबाद आमने-सामने](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/18181502/WhatsApp-Image-2020-10-18-at-12.44.20-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
KKR vs SRH IPL 2020: इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13 व्या मोसमात आज कोलकाता नाइट राइडर्सचा सामना सनराइजर्स हैदराबादशी भिडणार आहे. दुबईतील शेख झायेद स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात प्रत्येकाची नजर इयॉन मॉर्गनच्या कर्णधारपदावर असणार आहे. फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी केकेआरचा कर्णधार कार्तिकने आपलं कर्णधार पद इयोन मोर्गनकडे सोपवलं आहे.
या सामन्यात मॉर्गनकडे संघाच्या रणनीतीसाठी बराच वेळ आहे. गेल्या सामन्यात मॉर्गनने काही बदल केले होते परंतु ते प्रभावी नव्हते. मसलन, क्रिस ग्रीनला पहिल्या ओव्हरसाठी पाठवणे हे निर्णय संघासाठी यशस्वी ठरले नाही. मॉर्गन हैदराबादविरुद्ध संघातील खेळाडूंचा कसा उपयोग करतो हे पाहणे बाकी आहे. मॉर्गनला चिंता फलंदाजीची असणार आहे. आता संघातील खेळाडूंमध्ये बदल होऊ शकत नाही, परंतु त्यांची मानसिकता बदलू शकते आणि जर मॉर्गन हे करण्यात यशस्वी ठरला तर संघाचे नवे रूप पाहायला मिळेल.
केकेआरच्या फलंदाजांकडून अपेक्षित कामगिरी झालेली नाही. केकेआरच्या गोलंदाजांनी प्रभाव पाडला पण मुंबई आणि बंगलोरविरुद्ध तेही काही विशेष कामगिरी करू शकले नाहीत. हैदराबादचा संघही पॉईंट टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांचाही विजयासाठी संघर्ष सुरू आहे. हैदराबादचा संघ चौथ्या विजयसाठी उत्सुक आहे.
पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर कोलकाता नाइट रायडर्सचा संघ आहे. कोलकाताकडे 8 गुण आहेत. तर, सनरायझर्स हैदराबादकडे 6 गुण आहेत. त्यामुळे प्ले ऑफ गाठण्यासाठी आता कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात स्पर्धा आहे.
संभाव्य टीम
कोलकाता नाइट राइडर्स : इयोन मोर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, सुनील नरेन, कुलदीप यादव, शुभमन गिल, लॉकी फग्र्यूसन, नीतीश राणा, रिंकू सिंह, प्रसिद्ध कृष्णा, संदीप वॉरियर, अली खान, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, सिद्देश लाड, पैट कमिंस, टॉम बेंटन, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, एम. सिद्धार्थ, निखिल नाइक, क्रिस ग्रीन।
सनरायजर्स हैदराबाद : डेविड वार्नर (कर्णधार) ,अभिषेक शर्मा, बैसिल थम्पी, भुवनेश्वर कुमार, बिली स्टानलेक, जॉनी बेयरस्टो, केन विलियम्सन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, राशिद खान, संदीप शर्मा, शहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी. नटराजन, विजय शंकर, रिद्धिमान साहा, विराट सिंह, प्रीयम गर्ग, जेसन होल्डर, संदीप बवांका, फाबियान ऐलेन, अब्दुल समद, संजय यादव
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)