एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई इंडियन्स चौथ्यांदा चॅम्पियन, चेन्नई सुपरकिंग्सवर एका धावेने थरारक विजय
आयपीएलच्या 12 व्या मोसमाच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सचा अवघ्या एका धावेने पराभव करून आयपीएलच्या इतिहासात चौथ्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे.
हैदराबाद : आयपीएलच्या 12 व्या मोसमाच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सचा अवघ्या एका धावेने पराभव करून आयपीएलच्या इतिहासात चौथ्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. हैदराबादच्या रणांगणातल्या या सामन्यात मुंबईने चेन्नईला विजयासाठी 150 धावांचे माफक आव्हान दिले होते. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईचा संघ केवळ 148 धावांपर्यंतच मजल मारु शकला.
शेन वॉटसनने तीन जीवदानांचा लाभ उठवून 80 धावांची तुफानी खेळी केली आणि चेन्नईला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. सामना संपायला दोन चेंडू असताना वॉटसन धावचीत झाला आणि सामन्याला पुन्हा कलाटणी मिळाली. चेन्नईला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर केवळ दोन धावांची आवश्यकता होती. लसिथ मलिंगाने त्या चेंडूवर शार्दूल ठाकूरला पायचित करून, मुंबई इंडियन्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना मुंबईला 20 षटकांत 8 बाद 149 धावांचीच मजल मारता आली. हैदराबादमधल्या या सामन्यात क्विन्टन डी कॉक आणि रोहित शर्माने मुंबईला पाच षटकांत 45 धावांची सलामी दिली होती. शार्दूल ठाकूरने डी कॉकला माघारी धाडून ही जोडी फोडली आणि मुंबईच्या डावाला घरघर सुरु झाली. मुंबईची एक बाद ४५ धावांवरून १५ षटकांत पाच बाद 102 अशी घसरगुंडी उडाली. त्या परिस्थितीत कायरन पोलार्डने 25 चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 41 धावांची खेळी उभारून मुंबईच्या डावाला आकार दिला.
Unprecedented scenes from Hyderabad as @mipaltan became #VIVOIPL champs for the 4⃣th time! Lasith Malinga showing his true class in the last over 😎#MIvCSK pic.twitter.com/ZzVK0KHx5O
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement