एक्स्प्लोर
ऑरेन्ज कॅप पटकावत IPL मध्ये कोहलीची 'विराट' कामगिरी
बंगळुरु : डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादनं आयपीएलच्या नवव्या मोसमात विजेतेपदाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने यंदाच्या आयपीएलमध्ये ऑरेन्ज कॅप पटकावली आहे.
कोहली यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा ठोकणारा फलंदाज ठरला आहे. यंदाच्या मोसमात 16 सामन्यांमध्ये 81.08 च्या सरासरीने त्याने 973 धावांचा रतीब घातला. आयपीएलच्या एकाच मोसमात एक हजार धावा करण्याची कोहलीची संधी हुकली, मात्र आयपीएलमध्ये 900 धावांचा टप्पा पार करणारा कोहली एकमेव फलंदाज आहे. गेलने 2012 मध्ये आयपीएलमधल्या सर्वाधिक (733) धावा केल्या होत्या.
अवघ्या दोन धावांनी ब्रॅडमनचा रेकॉर्ड राहिला
एकाच सीरीजमध्ये सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. त्यांनी 1930 साली एशेज सीरीजमध्ये 974 धावा बनवल्या होत्या. डॉन ब्रॅडमन यांनी हा विक्रम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केला होता, तर विराट देशांतर्गत क्रिकेटमध्ये हा विक्रम मोडण्याच्या मार्गावर होता.
कोहलीने आणखी एक धाव केली असती, तर ब्रॅडमनच्या विक्रमाची बरोबरी झाली असती, तर विक्रम मोडण्यासाठी त्याला दोन धावांची गरज होती. कोहलीच्या चाहत्यांना त्याच्याकडून हा विक्रम मोडण्याची अपेक्षा होती, मात्र तो पूर्ण होऊ शकला नाही.
यंदा कोहलीनं एकूण चार शतकं आणि सात अर्धशतकं साजरी केली. तसंच 83 चौकार आणि 38 षटकारांचीही बरसात केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement