एक्स्प्लोर
कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत विजय, रहाणे नववा भारतीय
धर्मशाला : हिमाचल प्रदेशातील धर्मशाला कसोटीत टीम इंडियाने हिमालयाच्या साक्षीने विजयाची गुढी उभारली. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने धर्मशाला वनडेत ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने धुव्वा उडवून, कसोटी मालिकेत विजयाची गुढी उभारली.
रहाणेच्या वेगावन फलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचं 106 धावांचं आव्हान तुटपुंज ठरलं. रहाणेने 27 चेंडूत झटपट नाबाद 38 धावा केल्या. या खेळीत त्याने चार चौकार आणि 2 खणखणीत षटकार ठोकले. पॅट कमिन्सला सलग दोन षटकार ठोकून, रहाणेने ऑस्ट्रेलियाची हवा काढली.
दुसरीकडे या कसोटी मालिकेत तुफान फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर के एल राहुलने आणखी एक नाबाद अर्धशतक झळकावलं. राहुलने 76 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली खेळताना पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं विजय साजरा केला. टीम इंडियानं ही मालिकाही 2-1 अशी खिशात टाकून बोर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे.
चौथ्या दिवशी भारतासमोर विजयासाठी 87 धावांचं माफक लक्ष्य होतं. त्याचा पाठलाग करताना मुरली विजय आठ धावांवर आणि चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाला. पण लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणेनं अभेद्य अर्धशतकी भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. राहुलनं 76 चेंडूंत 9 चौकारांसह नाबाद 51 धावांची खेळी रचली. तर रहाणेनं 27 चेंडूंत 4 चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 38 धावा फटकावल्या.
संपूर्ण कसोटी मालिकेतील विक्रम
सर्वाधिक विकेट –
- रवींद्र जाडेजा – 25
- आर अश्विन – 21
- ओकिफ – 19
- लायन – 19
- स्टीव्ह स्मिथ – 499
- चेतेश्वर पुजारा – 405
- के एल राहुल – 393
- वि. न्यूझीलंड : 3-0
- वि. इंग्लंड : 4-0
- वि. बांगलादेश : 1-0
- ऑस्ट्रेलिया : 2-1
- पॉल उम्रीगर
- सुनील गावसकर
- रवी शास्त्री
- सचिन तेंडुलकर
- सौरव गांगुली
- वीरेंद्र सेहवाग
- अनिल कुंबळे
- महेंद्र सिंह धोनी
- अजिंक्य रहाणे
- भारत - 122
- ऑस्ट्रेलिया - 108
- दक्षिण आफ्रिका - 107
- इंग्लंड - 101
- न्यूझीलंड - 98
- पाकिस्तान - 97
- श्रीलंका - 90
- वेस्ट इंडिज - 69
- चेतेश्वर पुजारा पहिल्यांदाच भारतीय मैदानात शून्यावर बाद झाला. यापूर्वी परदेशात खेळलेल्या 31 कसोटी सामन्यांमध्ये तो दोन वेळा शून्यावर बाद झाला होता.
- साल 2000 नंतर पहिल्यांदाच भारतीय गोलंदाजांनी एका सामन्यात तीन किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेतल्या. यापूर्वी न्यूझीलंडमध्ये भारतीय गोलंदाजांनी ही कामगिरी केली होती.
- मालिकेतील पहिल्या कसोटीत पराभव होऊनही मालिका जिंकण्याचा विक्रम चौथ्यांदा केला आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध 1972-73 मध्ये, 2000-01 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि 2015 मध्ये श्रीलंकविरुद्ध भारताने अशी कामगिरी केली होती.
- फिरकीपटू आर. अश्विनने 2016-17 या मोसमात सर्वाधिक 79 विकेट घेण्याचा विक्रम केला. एका मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा अश्विन पहिलाच गोलंदाज ठरला. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज डेल स्टेनच्या 2007-08 साली घेतलेल्या 78 विकेटचा विक्रम मोडीत काढला.
- सलामीवीर केएल राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत सहा अर्धशतक ठोकले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी करणार राहुल पहिलाच भारतीय सलामीवीर फलंदाज आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच अर्धशतक ठोकण्याचा विक्रम मुरली विजयने 2014-15 मध्ये केला होता.
- भारताने मायदेशात खेळलेल्या या मोसमातील 13 सामन्यांपैकी 10 सामन्यात विजय मिळवला. पुण्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला, तर दोन सामने अनिर्णित राहिले.
- कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात हा सलग सातवा कसोटी मालिका विजय ठरला. 2015 मध्ये श्रीलंकेला 2-1 ने हरवल्यानंतर भारताने दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement