एक्स्प्लोर
Tokyo Olympics 2020 : विनेश फोगाटनं मिळवलं ऑलिम्पिकचं तिकीट
भारताची महिला पैलवान विनेश फोगाटने टोकियो ऑलिम्पिकचं आपलं तिकीट कन्फर्म केलं आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी विनेश फोगाट ही भारताची पहिली पैलवान ठरली आहे.
नवी दिल्ली : भारताची महिला पैलवान विनेश फोगाटने टोकियो ऑलिम्पिकचं आपलं तिकीट कन्फर्म केलं आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी विनेश फोगाट ही भारताची पहिली पैलवान ठरली आहे. विनेशनो कझाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत 53 किलो वजनी गटाच्या रॅपेचेज फेरीत अमेरिकेच्या सारा एनवर मात करुन ऑलिम्पिक कोटा मिळवला. आता कांस्यपदकासाठी विनेशची लढत आज रात्री ग्रीसच्या मारिया प्रिओलाराकीसोबत होणार आहे.
मंगळवारी झालेल्या सामन्यान विनेशला जापानच्या विद्यमान जग्गजेत्या मायु मुकैदाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे ती जागतिक अजिंक्यपदाच्या शर्यतीतून बाहेर झाली आहे. मात्र, विनेशच्या रॅपेचेजद्वारे कांस्य पदकाच्या आशा अद्याप कायम आहेत.
News Flash: Vinesh Phogat upsets reigning World Silver medalist Sarah Hildebrandt 8-2 to enter Bronze medal play-off bout (53 kg) of World Wrestling Championships. Even more importantly she get India its 1st Quota for Tokyo Olympics. #WrestleNurSultan pic.twitter.com/JoCSFbcmC0
— India_AllSports (@India_AllSports) September 18, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement