एक्स्प्लोर
अमेरिकेत टी-20चा थरार, भारत-वेस्ट इंडिज फ्लोरिडात भिडणार

मुंबई: भारत आणि वेस्ट इंडिज संघांमध्ये फ्लोरिडात दोन ट्वेन्टी ट्वेन्टी सामने खेळवण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावाला बीसीसीआयनं हिरवा कंदिल दिला आहे. 27 आणि 28 ऑगस्ट रोजी ट्वेन्टी ट्वेन्टी सामने खेळवले जातील. बीसीसीआयच्या कार्यकारिणीची बैठक आज मुंबईतल्या मुख्य कार्यालयात पार पडली. या बैठकीत लोढा समितीच्या शिफारसी लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाबाबतही चर्चा झाली. या शिफारसींविषयी बीसीसीआयला मार्गदर्शन करण्यासाठी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांच्या अध्यक्षतेखाली एका चार सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.
आणखी वाचा























