एक्स्प्लोर
INDvsSL : मॅथ्यूज, चंडिमलचं शतक, भारतावर संघर्षाची वेळ
श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूज आणि कर्णधार दिनेश चंडिमलनं दिल्ली कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांना आपल्या विकेटसाठी कठोर संघर्ष करायला लावला.
नवी दिल्ली : श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूज आणि कर्णधार दिनेश चंडिमल या दोघांनीही भारताविरुद्धच्या दिल्ली कसोटीत शतकं साजरी केली. त्यामुळे श्रीलंकेला या कसोटीत फॉलोऑनची नामुष्की टाळता आली. तिसऱ्या दिवसअखेरीस श्रीलंकेला 9 बाद 356 धावांची मजल मारता आली.
श्रीलंकेच्या मॅथ्यूज आणि चंडिमलने तर भारतीय गोलंदाजांना तिसऱ्या दिवशी आपल्या विकेटसाठी संघर्ष करायला लावला. भारतीय क्षेत्ररक्षकांनी पहिल्या दोन सत्रांमध्ये चार झेल सोडून श्रीलंकन फलंदाजांच्या त्या संघर्षाला मदतच केली. अखेर रवीचंद्रन अश्विनने अँजलो मॅथ्यूजला माघारी धाडून भारताला चौथं यश मिळवून दिलं. पण तोपर्यंत मॅथ्यूज आणि चंडिमल या जोडीने चौथ्या विकेटसाठी 181 धावांची भागीदारी रचली होती.
अँजलो मॅथ्यूजने 14 चौकार आणि दोन षटकारांसह 111 धावांची खेळी उभारली. दिनेश चंडिमलने अजूनही एक खिंड अजूनही थोपवून धरली आहे. चंडिमलने 18 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 147 धावांची खेळी केली आहे.
त्याआधी, भारताने प्रथम फलंदाजी करताना तब्बल 536 धावांचा डोंगर रचला. या धावसंख्येमध्ये सलामीवीर मुरली विजय 155, विराट कोहली 243 आणि रोहित शर्मा 65 यांची सर्वात मोठी भागीदारी आहे. विराटने आणखी एक द्विशतक ठोकत अनेक विक्रम नावावर केले आहेत.
संबंधित बातम्या :
विराटने पुन्हा एकदा स्वतःचाच विक्रम मोडला!
विराटचं आणखी एक द्विशतक, सर्वाधिक द्विशतक ठोकणारा एकमेव कर्णधार
INDvsSL : भारताचा पहिला डाव 536 धावांवर घोषित दिल्लीतील प्रदूषणामुळे श्रीलंकेवर मास्क लावून खेळण्याची वेळअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
नागपूर
व्यापार-उद्योग
Advertisement