एक्स्प्लोर
नागपूर वन डेत अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्माची अभेद्य अर्धशतकी सलामी
नागपूरच्या वन डेत विजयासाठी २४३ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियानं 14 व्या षटकांत बिनबाद ६५ धावांची मजल मारली आहे. सलामीच्या अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांनी आपापली खिंड छान लावून धरली आहे.
![नागपूर वन डेत अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्माची अभेद्य अर्धशतकी सलामी India Vs Australia Nagpur One Day Match Latest Update नागपूर वन डेत अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्माची अभेद्य अर्धशतकी सलामी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/29211256/rohit-sharma-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
फाईल फोटो
मुंबई : नागपूरच्या वन डेत विजयासाठी २४३ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियानं 14 व्या षटकांत बिनबाद ६५ धावांची मजल मारली आहे. सलामीच्या अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांनी आपापली खिंड छान लावून धरली आहे. त्यामुळं नागपूरच्या रणांगणात भारतीय संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला ५० षटकांत नऊ बाद २४२ धावांत रोखलं. वॉर्नर आणि फिन्चनं ६६ धावांची सलामी देऊन ऑस्ट्रेलियाच्या डावाचा पाया घातला.
त्यानंतर हेड आणि स्टॉईनिसनं पाचव्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी रचली. पण त्याखेरीज ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना छोट्यामोठ्या भागीदारी उभारण्यात अपयश आलं.
भारतीय गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना माघारी धाडण्याची कामगिरी बजावली. भारताकडून अक्षर पटेलनं ३८ धावांत तीन, तर जसप्रीत बुमरानं ५१ धावांत दोन फलंदाजांना माघारी धाडलं.
तर केदार जाधव, हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमारनं प्रत्येकी एक विकेट काढली.
संबंधित बातम्या
नागूपरच्या वन डेत टीम इंडियासमोर विजयासाठी 243 धावांचं आव्हान
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)