एक्स्प्लोर

India vs Australia 1st T20 Preview : घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकण्याचा भारताचा प्रयत्न

आयसीसीच्या ट्वेन्टी 20 आणि वन डे क्रमवारीतही टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी ट्वेन्टीत पाचव्या तर वन डे क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे. क्रमवारीतली ही तफावत आणि भारताची ट्वेन्टी ट्वेन्टीतली सध्याची ताकद पाहता या मालिकेतही भारतंच वर्चस्व गाजवेल अशी आशा आहे.

ऑस्ट्रेलियाला हरवलं ऑस्ट्रेलियात... त्यानंतर न्यूझीलंडला न्यूझीलंडमध्ये लोळवलं... आणि आता विराट कोहलीची टीम इंडिया सज्ज झाली आहे कांगारुंविरुद्धच्या आणखी एका आव्हानासाठी... भारत आणि ऑस्ट्रेलियन फौजा तीन महिन्यांनंतर पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. निमित्त आहे ते उभय संघांमधल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेचं. या मालिकेतली पहिली लढत आज संध्याकाळी 7 वाजता विशाखापट्टणमच्या मैदानात रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यात दोन ट्वेन्टी 20 आणि पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे. इंग्लंडमधल्या आगामी विश्वचषकाच्या पूर्वतयारीसाठी टीम इंडियाला ही अखेरची संधी आहे. विराट कोहलीच्या टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला वन डेत 2-1 असं हरवलं होतं. मग रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने न्यूझीलंडचा न्यूझीलंडमध्ये 4-1 असा धुव्वा उडवला होता. आता मायदेशातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी आणि वन डे मालिकेतही टीम इंडियाच्याच वर्चस्वाची अपेक्षा आहे. आयसीसीच्या ट्वेन्टी 20 आणि वन डे क्रमवारीतही टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी ट्वेन्टीत पाचव्या तर वन डे क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे. क्रमवारीतली ही तफावत आणि भारताची ट्वेन्टी ट्वेन्टीतली सध्याची ताकद पाहता या मालिकेतही भारतंच वर्चस्व गाजवेल अशी आशा आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि जसप्रीत बुमरा या मालिकेच्या निमित्ताने ट्वेन्टी ट्वेन्टीत पुनरागमन करणार आहेत. वन डे संघात स्थान न मिळालेल्या दिनेश कार्तिकसाठीही विश्वचषकाच्या दृष्टीने या मालिकेतली कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. याशिवाय उपकर्णधार रोहित शर्मा, शिखर धवनसह रिषभ पंत आणि अनुभवी महेंद्रसिंग धोनीची कामगिरीही महत्त्वाची ठरणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आजवर 18 ट्वेन्टी 20 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यात अकरा वेळा भारताने तर सहा वेळा कांगारुंनी बाजी मारली आहे. याशिवाय टीम इंडियाची कांगारुंविरुद्ध मायदेशातली कामगिरी ही नेहमीच वरचढ राहिली आहे. त्यामुळे आगामी मालिकेतही हीच परंपरा कायम राखण्याचा विराट आणि त्याच्या शिलेदारांचा प्रयत्न राहिल. असा असेल संघ! भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, महेंद्र सिंह धोनी (यष्टीरक्षक), कृणाल पंड्या, विजय शंकर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, सिद्धार्थ कौल आणि मयांक मार्कंडेय. आस्ट्रेलिया : अॅरॉन फिन्च (कर्णधार), डार्सी शार्ट, पॅट कमिन्स, अॅलेक्स कारे, जेसन बेहरेनडोर्फ, नॅथन कूल्टर नाईल, पीटर हॅण्डकोंब, उस्मान ख्वाजा, नॅथन लायन, ग्लेन मॅक्सवेल, जाय रिचर्डसन, केन रिचर्डसन, मार्कस स्टोयनिस, अॅशटन टर्नर आणि अॅडम जम्पा.

महत्त्वाच्या बातम्या

India vs UAE : मोठी बातमी, सलग दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, गोलंदाजांची पुन्हा धुलाई, यूएईचा भारतावर 6 विकेटनं दणदणीत विजय 
टीम इंडियाचा पुन्हा लाजिरवाणा पराभव, यूएईनं 26 बॉलमध्ये मॅच संपवली, भारतावर 6 विकेटनं दणदणीत विजय
Team India : न्यूझीलंडकडून चौथ्या टी 20 मध्ये भारताच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई, बीसीसीआयचा मोठा निर्णय, युवा गोलंदाजावर वनडेसाठी मोठी जबाबदारी  
चौथ्या टी 20 मध्ये भारताच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई, बीसीसीआयचा मोठा निर्णय, युवा गोलंदाजावर वनडेसाठी मोठी जबाबदारी
Yuvraj Singh: अभिषेक-वैभव-ईशानला न्याय मिळेना,  त्यांना वनडेत स्थान मिळावं,  युवराज सिंग नेमकं काय म्हणाला?
अभिषेक-वैभव-ईशानला न्याय मिळेना,  त्यांना वनडेत स्थान मिळावं,  युवराज सिंग नेमकं काय म्हणाला?
Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MNS : राज ठाकरेंच्या मनसेचा मोठा निर्णय, दु्ष्काळामुळं दीपोत्सव साधेपणानं साजरा करणार, रोषणाई-आतिषबाजी रद्द
राज ठाकरेंच्या मनसेचा मोठा निर्णय, दु्ष्काळामुळं दीपोत्सव साधेपणानं साजरा करणार, शिवाजी पार्कवरील रोषणाई-आतिषबाजी रद्द
लातूरमध्ये कुरिअरच्या पार्सलचा भीषण स्फोट; एक गंभीर जखमी, वाहनाचेही प्रचंड नुकसान, पोलीस घटनास्थळी
लातूरमध्ये कुरिअरच्या पार्सलचा भीषण स्फोट; एक गंभीर जखमी, वाहनाचेही प्रचंड नुकसान, पोलीस घटनास्थळी
Mumbai Police BDD Chawl Flat : राज्य सरकारचा नवा जीआर, मुंबईच्या बीडीडी चाळीतील पोलीस कुटुंबांना दीड कोटी भरावे लागणार, रहिवाशांमध्ये प्रचंड संताप
राज्य सरकारचा नवा जीआर, मुंबईच्या बीडीडी चाळीतील पोलीस कुटुंबांना दीड कोटी भरावे लागणार, रहिवाशांमध्ये प्रचंड संताप
Sanjay Gupta Passes away: संजय दत्तसोबत 9 चित्रपट , मग टोकाचं भांडण, अंडरर्वल्डकडून धमक्या, बेरोजगारीमुळे हॉटेलमध्ये कामाचा विचार, कसा होता संजय गुप्ताचा बॉलिवूडमधील प्रवास?
संजय दत्तसोबत 9 चित्रपट , मग टोकाचं भांडण, अंडरर्वल्डकडून धमक्या, बेरोजगारीमुळे हॉटेलमध्ये कामाचा विचार, कसा होता संजय गुप्ताचा बॉलिवूडमधील प्रवास?
SGB Gold Bond  योजनेमुळं गुंतवणकूदारांवर पैशांचा पाऊस, तब्बल 275 टक्के रिटर्न, आरबीआयकडून परिपत्रक जारी...
SGB Gold Bond  योजनेमुळं पैशांचा पाऊस, गुंतवणकूदारांना मिळणार तब्बल 275 टक्के रिटर्न
Filmmaker Sanjay Gupta Death: संजय गुप्ता रात्री बाथरूममध्ये पाय घसरुन पडले, सकाळपर्यंत कुणालाही पत्ताच नाही; बॉलिवूडच्या स्टार दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट, नेमकं घडलं काय?
संजय गुप्ता रात्री बाथरूममध्ये पाय घसरुन पडले, सकाळपर्यंत कुणालाही पत्ताच नाही; बॉलिवूडच्या स्टार दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट, नेमकं घडलं काय?
Ravindra Dhangekar: राणा सूर्यवंशी प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांनी मोर्चा थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे वळवला, प्रश्न उपस्थित करत दिला आंदोलनाचा इशारा, महायुतीत पुन्हा जुंपणार?
राणा सूर्यवंशी प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांनी मोर्चा थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे वळवला, प्रश्न उपस्थित करत दिला आंदोलनाचा इशारा, महायुतीत पुन्हा जुंपणार?
Mumbai Metro 4 Train Coach: वडाळा -कासारवडवली मेट्रो-4 ट्रेनची पहिली झलक, सायकल स्टँडपासून अँटी ड्रॅग सिस्टीम, काय आहेत वैशिष्ट्ये?
वडाळा -कासारवडवली मेट्रो-4 ट्रेनची पहिली झलक, सायकल स्टँडपासून अँटी ड्रॅग सिस्टीम, काय आहेत वैशिष्ट्ये?
Embed widget