एक्स्प्लोर
लॉर्ड्स कसोटीत इंग्लंड मजबूत स्थितीत, तिसऱ्या दिवसअखेर 357/6
कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने पहिल्या डावात सहा बाद 357 धावांची मजल मारली. ख्रिस वोक्सने आपल्या कसोटी कारकीर्दीतलं पहिलं शतक साजरं केलं.
लंडन : जॉनी बेअरस्टो आणि ख्रिस वोक्सच्या 189 धावांच्या भागीदारीमुळे इंग्लंडने लॉर्डसच्या दुसऱ्या कसोटीवर आपली पकड मजबूत केली आहे. कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने पहिल्या डावात सहा बाद 357 धावांची मजल मारली.
ख्रिस वोक्सने आपल्या कसोटी कारकीर्दीतलं पहिलं शतक साजरं केलं. तर यष्टिरक्षक बेअरस्टोने बारा चौकारांसह 93 धावांची खेळी केली. त्या दोघांनी मिळून भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं.
त्याआधी उपाहारानंतर इंग्लंडची 5 बाद 131 अशी अवस्था झाली होती. पण बेअरस्टो आणि वोक्सने सामन्याची सूत्रं आपल्या हातात घेत इंग्लंडची आघाडी दोनशेपार नेली.
भारताकडून मोहम्मद शमीने तीन फलंदाजांना माघारी धाडलं. हार्दिक पंड्याने दोन, तर ईशांत शर्माने एक विकेट घेतली. इंग्लंडच्या फलंदाजांना रोखण्यात भारतीय गोलंदाजांना म्हणावं तसं यश आलं नाही. त्यामुळेच इंग्लंडला मोठी आघाडी घेता आली.
भारत आणि इंग्लंड संघांमधल्या लॉर्ड्सच्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाचा सारा खेळ पावसामुळे वाया गेला होता.
भारताने या कसोटीसाठी संघात दोन बदल केले आहेत. सलामीवीर शिखर धवनला वगळून चेतेश्वर पुजाराला तर उमेश यादवला वगळून कुलदीप यादवला संधी देण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement