एक्स्प्लोर
चॅम्पियन्स ट्रॉफी: धोनीच्या संघातील 8 खेळाडू कोहलीच्याही संघात!
नवी दिल्ली: टीम इंडियानं 2013 साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली इंग्लंडमध्येच चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं होतं. आता विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघासमोर आपलं विजेतेपद कायम राखण्याचं आव्हान असेल.
धोनीच्या त्या संघातील आठ खेळाडू विराटच्या टीममध्येही खेळताना दिसतील.
धोनी आणि विराटशिवाय शिखर धवन, रोहित शर्मा, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादवनंही 2013 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.
संधी न मिळालेले खेळाडू
सुरेश रैना, ईशांत शर्मा, दिनेश कार्तिक, अमित मिश्रा, इरफान पठाण, मुरली विजय, विनय कुमार हे खेळाडू 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात होते, मात्र त्यांना यंदा कोहलीच्या संघात स्थान मिळालं नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर
अखेर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची निवड जाहीर करण्यात आली आहे. टीम इंडियात रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीनं पुनरागमन केलं आहे.
इंग्लंडमध्ये 1 ते 18 जून या कालावधीत चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं आहे.
इंग्लंडविरुद्ध मालिकेत खेळलेल्या अमित मिश्रा आणि दुखापतग्रस्त लोकेश राहुलऐवजी रोहित आणि शमीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
टीम इंडियात युवराज सिंगचं स्थान कायम असून, दिल्लीचा युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला मात्र भारताच्या वन डे संघात स्थान मिळवण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
क्रीडा
Advertisement