एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
झिम्बाब्वेला व्हाईटवॉश... तब्बल दहा गडी राखून टीम इंडिया विजयी
हरारे: धोनीच्या टीम इंडियानं हरारेच्या तिसऱ्या वन डेत झिम्बाब्वेचा दहा विकेट्सनी धुव्वा उडवून तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 असं निर्भेळ यश मिळवलं. भारतीय गोलंदाजांनी या सामन्यातही निर्विवाद वर्चस्व गाजवलं. जसप्रीत बुमराच्या भेदक माऱ्यासमोर झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली.
झिम्बाब्वेचा अख्खा डाव 43व्या षटकांत अवघ्या 123 धावांवर आटोपला. बुमरानं 10 षटकांत केवळ 22 धावा देऊन चार विकेट्स काढल्या. भारताकडून यजुवेन्द्र चहलनं दोन, तर धवल कुलकर्णी आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी एक विकेट काढली. मग सलामीच्या लोकेश राहुल आणि फैझ फजलनं 126 धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
राहुलनं 70 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 63 धावांची खेळी उभारली, तर फैझ फझलनं 61 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकारासह नाबाद 55 धावांची खेळी रचली. फैझ फजलनं वन डे पदार्पणातच अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम गाजवला.
--------------------------
हरारे : हरारेच्या मैदानातील तिसऱ्या आणि अखेरच्या वन डे सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा 123 धावांत खुर्दा उडवला. त्यामुळे विजयासाठी भारतासमोर 124 धावांचं आव्हान आहे.
भारतातर्फे जसप्रित बुमराने चार विकेट्स घेऊन झिम्बाब्वेच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं. तसंच यजुवेंद्र चहलने दोन तर धवल कुलकर्णी आणि अक्षर पटेलने प्रत्येकी एक विकेट घेऊन त्याला मोलाची साथ दिली. त्यामुळे झिम्बाब्वेचा डाव अवघ्या 123 धावांवर आटोपला.
या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाचा झिम्बाब्वेला फायदा घेता आला नाही. वुसी सिबांडाने संघातर्फे सर्वाधिक 38 धावा केल्या.
दरम्यान, धोनीने या सामन्यात नवीन खेळाडूला संधी दिली आहे. करुण नायर ऐवजी संघात फैझ फजल या युवा खेळाडूला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. धोनीच्या हस्ते फझलला टीम इंडीयाची कॅप देण्यात आली.
धोनीच्याटीम इंडियाने सलग दोन विजय मिळवून झिम्बाब्वे दौऱ्यातली तीन वन डे सामन्यांची मालिका आधीच खिशात घातली आहे. हाही सामना जिंकून झिम्बाब्वे दौऱ्यातल्या वन डे सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याचा धोनी ब्रिगेडचा प्रयत्न आहे.
https://twitter.com/BCCI/status/742960568647192576
धोनीच्या टीम इंडियानं लागोपाठ दोन विजय मिळवून झिम्बाब्वे दौऱ्यात तीन वन डे सामन्यांची मालिका आधीच खिशात घातली आहे. उर्वरित एक सामना जिंकून झिम्बाब्वे दौऱ्यातल्या वन डे सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ य़श मिळवण्याचा धोनी ब्रिगेडचा प्रयत्न असणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
Advertisement