एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारताची झिम्बाब्वेवर मात, मालिका 2-0 ने खिशात
हरारे : धोनीच्या टीम इंडियाने हरारेच्या दुसऱ्या वन डेत झिम्बाब्वेचा आठ विकेट्स राखून धुव्वा उडवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. टीम इंडियाने तब्बल दीड वर्षानंतर वन डेत मालिका विजय साजरा केला आहे.
हरारेच्या मैदानातील दुसऱ्या सामन्यातही भारतीय गोलंदाजांनी प्रभावी मारा करुन झिम्बाब्वेला 126 धावांतच रोखलं. यजुवेंद्र चहलने तीन तर बरिंदर सरन आणि धवल कुलकर्णीने प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या.
विजयासाठी 127 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर लोकेश राहुल 33 धावांवर माघारी परतला. पण करुण नायरने अंबाती रायुडूच्या साथीने 67 धावांची भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. नायरने 39 धावांची तर रायुडूने नाबाद 41 धावांची खेळी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
Advertisement