एक्स्प्लोर
अॅडलेड कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर, रोहित शर्माला संधी
गुरुवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या सामन्यासाठी दोन्ही देशांनी त्यांचे संघ जाहीर केले आहेत.
![अॅडलेड कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर, रोहित शर्माला संधी India and australia announced their team squad for adelaide test अॅडलेड कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर, रोहित शर्माला संधी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/12/05104517/virat-Kohli-adelaide-test.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अॅडलेड : गुरुवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. पहिला सामना अॅडलेडच्या ओव्हल मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही देशांनी त्यांचे संघ जाहीर केले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अंतिम 12 खेळाडूंची घोषणा केली आहे. यामध्ये रोहित शर्माचा समावेश करण्यात आला आहे. परंतु तो कितव्या क्रमांकावर खेळणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही.
नुकत्याच झालेल्या इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकांमध्ये रोहित शर्माला संधी मिळाली नव्हती. परंतु एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे रोहितला संधी देण्यात आली आहे.
सराव सामन्यात पृथ्वी शॉला दुखापत झाल्यामुळे के. एल. राहुल आणि मुरली विजय यांना सलामीला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. भारतासोबत ऑस्ट्रेलियानेही अॅडलेड कसोटीसाठी अंतिम अकरा खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत.
भारतीय संघ
विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के.एल. राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह
ऑस्ट्रेलियन संघ मार्कस हॅरिस, अॅरोन फिंच, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हॅण्ड्सकोम्ब, ट्रॅव्हीस हेड, टीम पेन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूडTeam India's 12 for the 1st Test against Australia in Adelaide: Virat Kohli (C), A Rahane (VC), KL Rahul, M Vijay, C Pujara, Rohit Sharma, Hanuma Vihari, R Pant (WK), R Ashwin, M Shami, I Sharma, Jasprit Bumrah #TeamIndia #AUSvIND
— BCCI (@BCCI) December 5, 2018
BREAKING
India's squad of 12 for the first Test: Virat Kohli, Ajinkya Rahane, KL Rahul, Murali Vijay, Cheteshwar Pujara, Rohit Sharma, Hanuma Vihari, Rishabh Pant, Ravi Ashwin, Mohammed Shami, Ishant Sharma, Jasprit Bumrah #AUSvIND — cricket.com.au (@cricketcomau) December 5, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
ठाणे
क्राईम
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)