एक्स्प्लोर
अश्विन-साहाची शतकं, टीम इंडियाला सावरलं; भारत 353/10

सेंट लुशिया: भारताच्या रवीचंद्रन अश्विन आणि रिद्धीमान साहा या दोन्ही फलंदाजांनी शतकं ठोकूनही वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताचा पहिला डाव भारताचा पहिला डाव 353 धावांवर आटोपला. अश्विननं 118 धावांची खेळी केली. अश्विनचं हे विंडीज दौऱ्यावरचं दुसरं आणि कसोटी कारकीर्दीतलं चौथं शतक ठरलं. रिद्धीमान साहानं त्याच्या कसोटी कारकीर्दीत पहिल्यांदाच शतक साजरं केलं. त्या दोघांनी मिळून सहाव्या विकेटसाठी अभेद्य द्विशतकी भागीदारी रचली. अल्झारी जोसेफनं साहाला 104 धावांवर बाद करून ही जोडी फोडली आणि भारतीय फलंदाजी पुन्हा ढासळली. भारताच्या अखेरच्या पाच विकेट्स अवघ्या 14 धावांवर पडल्या.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
करमणूक
महाराष्ट्र
भारत























