एक्स्प्लोर
अटीतटीचा सामना आणि पांड्यांची शेवटची ओव्हर!
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत सामना अक्षरश: भारताच्या बाजूनं झुकवला.
थिरुवनंतरपुरम : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी-20 सामन्याची मालिका टीम इंडियानं 2-1नं आपल्या नावावर केली आहे. पावसामुळे थिरुवनंतरपुरममधील तिसरा आणि निर्णायक टी-20 सामना उशीरानं सुरु करण्यात आला. त्यामुळे सामना फक्त 8-8 षटकांचाच खेळवण्यात आला.
न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 5 विकेटच्या मोबदल्यात 67 धावा केल्या. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत सामना अक्षरश: भारताच्या बाजूनं झुकवला.
67 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडला पहिल्या षटकातच मोठा धक्का बसला. गप्टिल फक्त एका रन करुन बाद झाला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली. पण किवी फलंदाजांनी देखील शेवटपर्यंत हार मानली नाही. त्यामुळे अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता.
सातव्या ओव्हरपर्यंत न्यूझीलंडनं 6 गडी गमावून 49 धावा केल्या होत्या. त्यामुळे शेवटच्या षटकात त्यांना विजयासाठी 19 धावांची गरज होती. त्यावेळी कोहलीनं शेवटच्या ओव्हरसाठी हार्दिक पांड्याच्या हाती चेंडू सोपवला. यावेळी खेळपट्टीवर ग्रॅण्डहोम आणि सॅन्टनर ही जोडी होती. पहिल्याच चेंडूवर सॅन्टनरनं एक चोरटी धाव घेत ग्रॅण्डहोमला स्ट्राईक दिली.
दुसऱ्याच चेंडूवर ग्रॅण्डहोमनं एक सरळ जोरदार फटका मारला. पण त्यावेळी पांड्यानं चेंडू अडवला. तेव्हा पांड्याच्या बोटाला दुखापतही झाली. पण त्यानं संघासाठी महत्त्वाच्या धावा वाचवल्या.
पण तिसऱ्याच चेंडूवर ग्रॅण्डहोमनं थेट षटकार ठोकला. त्यामुळे पुढील तीन चेंडूमध्ये न्यूझीलंडला विजयसाठी फक्त 12 धावा हव्या होत्या. ग्रॅण्डहोमच्या फलंदाजीमुळे पांड्या काहीसा दबावात आला आणि त्यानं चौथ्या चेंडू वाईड टाकला.
त्यामुळे आता तीन चेंडूमध्ये न्यूझीलंडला फक्त 11 धावा हव्या होत्या. पण यावेळी पांड्यानं चांगला चेंडू टाकत फक्त एकच धाव दिली. दोन चेंडूमध्ये 10 धावा हव्या असताना सॅन्टनर मोठा फटका मारु शकला नाही. या चेंडूवर त्याला दोनच धावा मिळाल्या.
शेवटच्या चेंडूवर देखील सॅन्टनर फक्त एकच धाव घेऊ शकला आणि भारतानं सामन्यासह मालिकाही खिशात घातली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
बॉलीवूड
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement