IND vs ENG 4th Test : भारताला पहिला धक्का; लोकेश राहुल 46 धावांवर बाद तर रोहित-राहुलची अर्धशतकी सलामी
आज भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात रोहित शर्मा आणि केएल राहुल हे भारताला एक उत्तम आघाडी मिळवून देत दोघांनी 50 धावांची भागीदारी पूर्ण केली.
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी ओव्हल येथे खेळवला जात आहे. आज कसोटी सामन्याचा चौथ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. भारताने आज आपला दुसरा डाव बिनबाद 43 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केला आहे. तर काल इंग्लंडने पहिल्या डावात 290 धावा करत 99 धावांची आघाडी घेतली होता.
आज भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात रोहित शर्मा आणि केएल राहुल हे भारताला एक उत्तम आघाडी मिळवून देत दोघांनी 50 धावांची भागीदारी पूर्ण केली. रोहित शर्माने (26) आणि लोकेश राहुलने (23) धावा करत अर्धशतक झळकावलं. दरम्यान लोकेश राहुलच्या रूपात भारताने पहिली विकेट गमावली आहे. 46 धावांवर असताना जेम्स अॅंडरसनने त्या आऊट केले.
इंग्लंडचा पहिला डाव
इंग्लडने भारताविरूद्धच्या पहिल्या डावात 290 धावा करत 99 धावांची आघाडी घेतली. इंग्लंडकडून आज ओली पोपने 159 बॉलमध्ये सहा चौकरासह 81 धावा केल्या. तर ऑलराऊंडर क्रिस वोक्सने 60 बॉलमध्ये 11 चौकरासह 50 धावा केल्या. तर जॉनी बेयरस्टो ने 37 आणि मोईन अलीने 35 धावा केल्या. तर भारताकडून उमेश यादवने 76 धावा देत तीन विकेट घेतले. तर जसप्रित बुमराह आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी दोन विकेट घेतले. मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुरला एका विकेटावर समाधान मानावे लागले. ओली पोप आणि जॉनी बेअरस्टो यांनी संघाला आधार दिला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचली.
भारताचा पहिला डाव
भारताकडून फक्त शार्दुल ठाकूरने चांगली कामगिरी केली आहे. शार्दुलने 36 बॉलमध्ये तीन षटकार आणि सात चौकार मारत 57 धावा केल्या. या शिवाय कर्णधार विराट कोहलीने 50 धावा केल्या. तर दुरीकडे इंग्लंडच्या क्रिस व्रोक्सने सर्वाधिक चार विकेट घेतले तर ओली रॉबिन्सननी तीन विकेट घेतले. टॉस हरल्यानंतर प्रथम टीम इंडिया फलंदाजीसाठी मैदानात उतरली परंतु सुरुवातीलाच कामगिरी चांगली नव्हती. तर तिसऱ्या कसोटी सामन्यात शानदार कामगिरी करणारा चेतेश्वर पुजारा आज 4 धावा करत तंबूत परतला. रोहितने 27 बॉलमध्ये एक चौकरासह 11 धावा केल्या तर केएल राहुलने 44 बॉलमध्ये तीन चौकरासह 17 धावा केल्या तर चेतेश्वर पुजाराने 31 बॉलमध्ये एका चौकारसह चार धावा केल्या. तर कर्णधार विराट कोहली 96 बॉलमध्ये आठ चौकारासह 50 धावा करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 23,000 धावा करणारा फलंदाज बनला.