एक्स्प्लोर
IND Vs ENG 4th Test 2nd Day Highlights | चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी गाजली ऋषभ पंतची शतकी खेळी
पहिला डाव खेळण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारताची सुरुवात काही चांगली झाली नाही. दुसऱ्या दिवशी मात्र भारताचा डाव काहीसा सावरताना दिसला.
IND Vs ENG 4th Test 2nd Day Highlights अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये सुरु असलेल्या अखेरच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे इंग्लंडचा पहिला डाव 205 धावांवर आटोपला. ज्यानंतर पहिला डाव खेळण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारताची सुरुवात काही चांगली झाली नाही. दुसऱ्या दिवशी मात्र भारताचा डाव काहीसा सावरताना दिसला.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी 94 षटकांच्या खेळामध्ये भारतीय संघाची धावसंख्या 7 गडी बाद 294 धावा इतकी होती. यामध्ये वॉशिंग्टन सुंदर यानं 60 धावांचं योगदान दिलं. तर, त्याची साथ घेत ऋषभ पंतनं चौथ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस गाजवला. शतकी खेळी केल्यानंतर 101 वी धाव करत ऋषभ पंत झेलबाद झाला. ज्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर नाराजीची छटा पाहायला मिळाली.A brilliant century stand between Rishabh Pant and Washington Sundar helped India go to stumps on 294/7 on day two. The hosts lead by 89 runs.#INDvENG | https://t.co/6OuUwURcgX pic.twitter.com/CwUzuYc6Er
— ICC (@ICC) March 5, 2021
Pollard Six Sixes : कायरन पोलार्डची युवराजाच्या विक्रमाशी बरोबरी; एका ओव्हरमध्ये लगावले सहा षटकार
पंतचं हे कसोटी क्रिकेटमधील तिसरं शतक ठरलं तर, भारतीय भूमीत त्यानं केलेलं हे पहिलं कसोटी शतक ठरलं. दरम्यान, दुसऱ्या दिवसअखेर वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल हे खेळाडू खेळपट्टीवर अनुक्रमे 60 आणि 11 धावांसह टिकून होते. सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेट संघाकडे 89 धावांची आघाडी आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement