एक्स्प्लोर

IND vs ENG 2nd Test : इंग्लंडला रिषभ पंतची भीती, ऑलराऊंडरनं सत्य स्वीकारलं, रिषभ पंतसाठी खास प्लॅन तयार करणार

IND vs ENG 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी 2 जुलैपासून बर्मिंघममध्ये सुरु होणार आहे. इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटीत रिषभ पंतनं दोन शतकं केली होती. 

IND vs ENG Test Series: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी बर्मिंघममध्ये खेळवली जाणार आहे. या मॅचपूर्वी इंग्लंडचा ऑलराऊंडर क्रिस वोक्सनं रिषभ पंत बाबत मोठं वक्तव्य केलं आहे. इंग्लंडचा संघ रिषभ पंतचा सामना करण्यासाठी  खास प्लॅन तयार करेल, असं म्हटलं. रिषभ पंतनं हेडिंग्लेच्या लीडस कसोटीतील दोन्ही डावात शतक केलं होतं. वोक्सनं म्हटलं की पंतची क्रिकेट खेळण्याची स्टाईल अशी आहे ज्यानं जगातील कोणतीही गोलंदाजी दबावात येईल.  

क्रिस वोक्सनं एका पत्रकार परिषदेत असं म्हटलं की, रिषभ पंत असा खेळाडू आहे, ज्याच्या बाबत तुम्ही तो काय करेल हे सांगू शकत नाही. कधी कधी अशा फलंदाजांविरुद्ध गोलंदाजी करणं रोमांचक काम असतं. कधी कधी गोलंदाजांना बॅकफूटवर ढकण्याच काम करतो. तो गेम पुढं घेऊन जातो,  मात्र तो क्रीजवर असेपर्यंत सामन्यात रोमांचक स्थिती होती. 

रिषभ पंतसाठी विशेष प्लॅनिंग 

क्रिस वोक्सनं म्हटलं की हेडिंग्लेमध्ये रिषभ पंतनं चांगली खेळी केली, त्यानं दोन्ही डावात शतकं केली होती. वोक्सनं म्हटलं की मला आशा आहे की आम्ही त्याला लवकर आऊट करु शकू, आम्ही सर्वांनी एकत्र चर्चा केलेली नाही. मात्र, आम्ही काही खेळाडूंवर नक्की चर्चा करणार आहे. त्या खेळाडूंविरुद्ध चागंली कामगिरी करण्याचा प्रयत्न करु, क्रिस वोक्सनं म्हटलं. 

रिषभ पंतनं इंग्लंड विरुद्ध दमदार कामगिरी केली आहे. इंग्लंड विरुद्ध कसोटीमध्ये 1000 धावांचा टप्पा पार केला आहे. इंग्लंडच्या धरतीवर 1000 धावा तो लवकरच पूर्ण करेल. पंतनं आतापर्यंत इंग्लंडमध्ये 10 कसोटीत 808 धावा केल्या आहे.  

रिषभ पंतची पहिल्या कसोटीत दोन शतकं 

भारताचा आक्रमक खेळाडू रिषभ पंतवर या मालिकेदरम्यान उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर, शुभमन गिल कॅप्टन आहे. रिषभ पंतनं दोन्ही डावात शंभर धावा पूर्ण केल्या. भारताकडून पहिल्या कसोटीत यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल आणि रिषभ पंतनं शतक केली. मात्र, पहिल्या कसोटीत मधली फळी आणि लोअर मिडल ऑर्डरचे फलंदाज अपयशी ठरले.  साई सुदर्शन, करुण नायर, रवींद्र जडेजा दोन्ही कसोटीत अपेक्षित कामगिरी करु शकले नाहीत. दुसऱ्या कसोटीत भारताला विजय मिळवायचा असेल तर गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्हीमध्ये  चांगली कामगिरी करणं आवश्यक आहे. इंग्लंडनं संघ जाहीर केला असून त्यांनी कोणताही बदल केला नाही.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : टॉप ऑर्डर फेल ते सरावाचा अभाव, टीम इंडियाचं पहिल्या वनडेत नेमकं काय चुकलं? पराभव 'या' कारणामुळं 
Team India : टॉप ऑर्डर फेल ते सरावाचा अभाव, टीम इंडियाचा  पहिल्या वनडेत पराभव 'या' कारणामुळं, जाणून घ्या 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2025 | रविवार
राज ठाकरे हे कुशल संघटक, मात्र त्यांच्या भूमिकेत सातत्य नाही, सुधीर मुनगंटीवारांची टीका
राज ठाकरे हे कुशल संघटक, मात्र त्यांच्या भूमिकेत सातत्य नाही, सुधीर मुनगंटीवारांची टीका
Raju Shetti on Murlidhar Mohol: मी नुरा कुस्ती खेळतो की पट काढून चितपट करतो याची माहिती मोहोळ अण्णांनी त्यांच्या राजकीय वस्तादांकडून घ्यावी; राजू शेट्टींचा पलटवार
मी नुरा कुस्ती खेळतो की पट काढून चितपट करतो याची माहिती मोहोळ अण्णांनी त्यांच्या राजकीय वस्तादांकडून घ्यावी; राजू शेट्टींचा पलटवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Voter List Fraud: निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचा 1 नोव्हेंबरला एल्गार
Voter List Row: 'विरोधकांची केविलवाणी धडपड, फक्त मिमिक्री करतायत', Pravin Darekar यांची टीका
Voter List Row: मतदार यादीत घोळ? लोकशाही प्रक्रियेला धोका असल्याचा गंभीर आरोप
Pravin Darekar : राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर, वाद पेटला
Raj Thackeray : 'निवडणुका मॅच फिक्सिंग, निकाल आधीच ठरलाय', राज ठाकरेंचा गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : टॉप ऑर्डर फेल ते सरावाचा अभाव, टीम इंडियाचं पहिल्या वनडेत नेमकं काय चुकलं? पराभव 'या' कारणामुळं 
Team India : टॉप ऑर्डर फेल ते सरावाचा अभाव, टीम इंडियाचा  पहिल्या वनडेत पराभव 'या' कारणामुळं, जाणून घ्या 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2025 | रविवार
राज ठाकरे हे कुशल संघटक, मात्र त्यांच्या भूमिकेत सातत्य नाही, सुधीर मुनगंटीवारांची टीका
राज ठाकरे हे कुशल संघटक, मात्र त्यांच्या भूमिकेत सातत्य नाही, सुधीर मुनगंटीवारांची टीका
Raju Shetti on Murlidhar Mohol: मी नुरा कुस्ती खेळतो की पट काढून चितपट करतो याची माहिती मोहोळ अण्णांनी त्यांच्या राजकीय वस्तादांकडून घ्यावी; राजू शेट्टींचा पलटवार
मी नुरा कुस्ती खेळतो की पट काढून चितपट करतो याची माहिती मोहोळ अण्णांनी त्यांच्या राजकीय वस्तादांकडून घ्यावी; राजू शेट्टींचा पलटवार
Share Market : तीन दिवसात सेन्सेक्सवर 1900 अंकांची तेजी, निफ्टी मजबूत, दिवाळीपूर्वी गुंतवणूकदारांना दिलासा
तीन दिवसात सेन्सेक्सवर 1900 अंकांची तेजी, निफ्टी मजबूत, दिवाळीपूर्वी गुंतवणूकदारांना दिलासा
Sanjay Raut : निवडणूक आयोगाच्या मॅच फिक्सिंग विरुद्ध लढा, संजय राऊतांकडून मोर्चाची घोषणा, सत्तेत असणाऱ्यांनी मोर्चाला यावं, जयंत पाटील यांचं आवाहन
निवडणूक आयोगाच्या मॅच फिक्सिंग विरुद्ध लढा, संजय राऊतांकडून मोर्चाची घोषणा, विरोधक पुन्हा एकत्र येणार
Video: 24 वर्षानंतर सेना भवनात, पायरीवर माथा टेकला; बाळा नांदगावकरांच्या अश्रूंचा बांध फुटला, म्हणाले...
Video: 24 वर्षानंतर सेना भवनात, पायरीवर माथा टेकला; बाळा नांदगावकरांच्या अश्रूंचा बांध फुटला, म्हणाले...
ज्यांना बोगस मतदानाचा फायदा होतो ते मोर्चात सहभागी होणार नाहीत; जयंत पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
ज्यांना बोगस मतदानाचा फायदा होतो ते मोर्चात सहभागी होणार नाहीत; जयंत पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
Embed widget