ENG VS IND : धोकादायक गोलंदाजाला बेंचवर बसवलं, इंग्लंडचा अजब निर्णय, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर, प्लेईंग 11 अशी असणार
England Playing 11 : इंग्लंडनं दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर केला आहे. दुसऱ्या कसोटीत जोफ्रा आर्चरला संधी देण्यात आलेली नाही.

बर्मिंघम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून सुरु होणार आहे. इंग्लंडनं दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर केला आहे. इंग्लंडनं 15 सदस्यांच्या संघात जोफ्रा आर्चरला स्थान दिलं होतं. मात्र, अंतिम 11 खेळाडूंमध्ये जोफ्रा आर्चरला स्थान देण्यात आलेलं नाही. आता भारताचा संघ कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागलं आहे. दुसऱ्या कसोटीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाण्याची शक्यता असून त्या जागी अर्शदीप सिंग किंवा आकाशदीपला संघात स्थान मिळू शकतं.
जोफ्राला संघात घेतलं पण बेंचवर बसवलं
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपैकी दुसऱ्या कसोटीला सुरुवात 2 जुलै रोजी होणार होणार आहे. ही मॅच बर्मिंघमच्या एजबेस्टनमध्ये होणार आहे. इंग्लंडनं दुसऱ्या कसोटीसाठी 15 सदस्यांचा संघ 26 जूनला जाहीर केला होता. त्यावेळी जोफ्रा आर्चरला संघात स्थान देण्यात आलं होतं. मात्र, त्याला अंतिम 11 मध्ये स्थान देण्यात आलेलं नाही.
इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीचा संघ जाहीर
बेन स्टोक्स (कॅप्टन ), शोएब बशीर, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रुट, जेमी स्मिथ, जोश टंग आणि क्रिस वोक्स.
जोफ्रा आर्चरचं कमबॅक लांबणीवर
इंग्लंडच्या संघाचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याचं कमबॅक लांबणीवर गेलं आहे. जोफ्रा आर्चरनं तब्बल 4 वर्षानंतर कसोटीमध्ये कमबॅक करणार होता मात्र आता ते लांबणीवर गेल्याचं स्पष्ट झालं आहे. . आर्चरनं 2021 मध्ये भारत दौऱ्यात कसोटी मध्ये खेळली होती. फेब्रुवारी 2021 मध्ये अहबदाबादमध्ये खेळली होती.
जोफ्रा आर्चरला दुखापतीमुळं क्रिकेटपासून चार वर्ष दूर राहावं लागलं आहे.तर, व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये 7 मॅच खेळल्या आहेत. आर्चरनं गेल्या काही दिवसांमध्ये काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये ससेक्सकडून क्रिकेट मॅच खेळली होती. जोफ्रा आर्चरनं 18 ओव्हरमध्ये गोलंदाजी केली होती तर पण त्याला एक विकेट मिळाली होती.
भारत कमबॅक करणार?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत शुभमन गिलपुढं मोठं आव्हान असणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्त्वात पहिल्या कसोटीत भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. भारताकडून दोन्ही डावात 5 शतकं करण्यात आली होती. मात्र, भारताच्या गोलंदाजांना इंग्लंडला दुसऱ्या डावात बाद करता आलं नाही. भारताच्या क्षेत्ररक्षकांनी सोडलेल्या कॅचचा देखील टीमला फटका बसला. दुसऱ्या मॅचमध्ये मधल्या फळीकडून आणि लोअर मिडल ऑर्डरकडून चांगल्या कामगिरीची भारताला आशा आहे.




















