एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गुवाहाटी टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव
टीम इंडियाने दिलेलं 119 धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 15.3 षटकांत पूर्ण केले.
गुवाहाटी : गुवाहाटी ट्वेंटी ट्वेंटीत ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाचा आठ विकेट्स राखून पराभव केला. टीम इंडियाने दिलेलं 119 धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 15.3 षटकांत पूर्ण केले.
मॉइजेस हेनरिकेज आणि ट्रॅविस हेड हे कांगारूंच्या विजयाचे शिल्पकार ठरले. या दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी अभेद्य 109 धावांची भागिदारी केली. हेनरिकेजनं आपल्या अर्धशतकी खेळीत 46 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह नाबााद 62 धावा फटकावल्या. तर हेडनं 34 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकारासह धावांची खेळी केली. या विजयासोबतच तीन सामन्यांच्या मालिकेत कांगारूंनी आता 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
तत्त्पूर्वी टीम इंडियाने 20 षटकांमध्ये सर्व विकेट्स गमावून 118 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या बेहरेनड्रॉफ, झम्पा यांच्या भेदक गोलंदाजीपुढे टीम इंडियातील मातब्बरांनी नांगी टाकली. सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या 8 धावांवर माघारी परतल्यानंतर कर्णधार कोहली भोपळाही न फोडता तंबूत परतला. त्यानंतर मनिष पांडे, शिखर धवनही एकेरी आकड्यांवर बाद झाले.
महेंद्रसिंग धोनीची जादूही दुसऱ्या टी 20 सामन्यात पाहायला मिळाली नाही. धोनी 13 धावांवर यष्टिचीत झाला. पांड्या 25 तर केदार जाधव 27 धावांवर माघारी परतले. केदारच्या 27 धावा या इतर खेळाडूंच्या तुलनेत सर्वाधिक ठरल्या.
निम्मा संघ गारद झाल्यानंतर तळाचे फलंदाजही झटपट बाद झाले. भुवनेश्वर, बुमराह, चहल यांची मजलही एकेरी आकड्याच्या पलिकडे गेली नाही.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनड्रॉफनं भेदक गोलंदाजी करताना केवळ 21 धावा देत टीम इंडियाच्या 4 फलंदाजांना माघारी धाडलं. त्यानंतर अॅडम झंपानं त्याला सुरेख साथ देत 19 धावात दोन विकेट्स घेतल्या. तर नाथन कुल्टर नाईल, अॅन्ड्रू टाय आणि मार्कुस स्टॉयनिसनं प्रत्येकी एक विकेट घेतली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement