एक्स्प्लोर
VIDEO: भर मैदानातच कोहली आणि स्टोक्समध्ये बाचाबाची!
मोहाली: भारत आणि इंग्लंडमधील सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये बरीच शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. पाच सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0नं बढत घेतली आहे.
सामन्यातील 44व्या षटकात फिरकीपटू रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर बेन स्टोक्स बाद झाल. त्याला विकेटकीपर पार्थिव पटेलनं स्टपिंग केलं. बाद झाल्यानंतर माघारी जात असताना स्टोक्सनं जल्लोष करीत असलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंना काहीतरी बोलला. ज्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनंही त्याला प्रत्युत्तर केलं.
मैदानात उपस्थित पंचांकडे विराट कोहलीनं याबाबत तक्रारही केली. अखेर पंचांनी यामध्ये मध्यस्थी करुन वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. भर मैदानाताच या दोघांमधील शाब्दिक बाचाबाची प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
तिसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडनं आठ गडी गमावून 268 धावांची मजल मारली. टीम इंडियाकडून उमेश, जयंत आणि जाडेजानं प्रत्येकी २ बळी घेतले. तर शमी आणि अश्विननं एक-एक गडी बाद केले.
VIDEO:
— Mahendra Singh Dhoni (@cricketworms) November 26, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
क्राईम
Advertisement