एक्स्प्लोर
हसीन जहांकडून पुन्हा एकदा शमीवर गंभीर आरोप
हसीनने पुन्हा एकदा मीडियासमोर येत शमीवर गंभीर आरोप केले आहेत. 'शमीने मला भेटण्यास नकार दिला. 'तुला कोर्टात पाहून घेऊ' अशी धमकीही त्याने मला दिली.'
![हसीन जहांकडून पुन्हा एकदा शमीवर गंभीर आरोप hasin Jahan again slaps allegations against Mohammad shami latest update हसीन जहांकडून पुन्हा एकदा शमीवर गंभीर आरोप](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/28082419/shami-and-hasin.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचा काही दिवसांपूर्वीच कार अपघात झाला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याची पत्नी हसीन जहां हिने त्याची काल दिल्लीत भेट घेतली. यावेळी हसीनसोबत मुलगी आयरा देखील होती. बऱ्याच दिवसांनी ही भेट झाल्याने शमीने पाहता क्षणीच तिला उचलून घेतलं. पण यावेळी हसीन मात्र त्याच्यापासून दूरच होती.
या भेटीनंतर हसीनने पुन्हा एकदा मीडियासमोर येत शमीवर गंभीर आरोप केले आहेत. 'शमीने मला भेटण्यास नकार दिला. 'तुला कोर्टात पाहून घेऊ' अशी धमकीही त्याने मला दिली.' असं हसीन जहां म्हणाली.
वादानंतर शमी आणि हसीन यांची काल (मंगळवार) पहिल्यांदाच भेट झाली. याआधी शमीने अनेकदा मीडियासमोर येऊन पत्नी आणि मुलीच्या भेटीची इच्छा व्यक्त केली होती.
हसीनने थेट सोशल मीडियावरुन शमीवर अनेक आरोप केले होते. आपल्याला मारहाण केल्याचा आरोपही तिने शमीवर केला होता. त्यानंतर तिने शमीवर मॅच फिक्सिंगसारखा गंभीर आरोपही केला होता.
हसीनच्या आरोपानंतर बीसीसीआयनेही शमीला कॉन्ट्रॅक्टमधून वगळलं होतं. पण चौकशीअंती बीसीसीआयकडून त्याला क्लीन चिट देण्यात आली. तसंच त्याला कॉन्ट्रॅक्ट यादीतही स्थान देण्यात आलं. त्यामुळे त्याचा आयपीएलमध्ये खेळण्याचा मार्गही मोकळा झाला.
VIDEO :
संबंधित बातम्या :
मी आजही शमीवर प्रेम करते : हसीन जहां
कार अपघातात मोहम्मद शमी जखमी, डोक्याला दहा टाके
बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून शमीला क्लीन चिट : सूत्र
शमीवरील आरोप बिनबुडाचे, पाकिस्तानी तरुणी आलिश्बाचा दावा
बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी टीमकडून हसीन जहांचीही चौकशी
मोहम्मद शमी चांगला माणूस, महेंद्रसिंग धोनी पाठीशी
कोट्यवधींच्या 'हसीन फार्म हाऊस'चा वाद शमीला नडला?
दक्षिण आफ्रिकेतील महिलेसोबतही शमीचं अफेअर : हसीन जहां
फोन हरवल्यापासून शमी चांगलं वागायला लागला : हसीन जहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)