क्रिकेटर दिलीप सरदेसाई यांना गूगलची आदरांजली
गूगलने डूडलच्या माध्यामातून भारताचे दिग्गज माजी कसोटी खेळाडू दिलीप सरदेसाई यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आज सरदेसाई यांची 78 जयंती आहे.

मुंबई : गूगलने डूडलच्या माध्यामातून भारताचे दिग्गज कसोटी खेळाडू दिलीप सरदेसाई यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आज सरदेसाई यांची 78 जयंती आहे. सरदेसाई यांची क्रिकेट कारकिर्द मोठी नसली, तरी वेस्टइंडीज विरुद्ध त्यांनी मिळवून दिलेला ऐतिहासिक विजय आजही सर्वांच्या आठवणीत आहे.
दिलीप सरदेसाई यांचा जन्म 8 ऑगस्ट 1940मध्ये गोव्यातील मडगाव येथे झाला होता. वयाच्या 67व्या वर्षी 2 जुलै 2007मध्ये त्यांचं मुंबईत निधन झालं.
दिलीप सरदेसाई यांची क्रिकेट कारकिर्द सरदेसाई यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दिची सुरुवात 1959-60मध्ये रोहिन्टन बारिया ट्रॉफीमध्ये बॉम्बे युनिव्हर्सिटीकडून केली. आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यांना भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळालं. सरदेसाई यांनी 1970-71मध्ये वेस्टइंडीज दौऱ्यात 642 धावा केल्या होत्या. सरदेसाई यांनी भारताकडून 33 कसोटी सामन्यातील 55 डावात 39.23च्या सरासरीने 2001 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 शतक आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 179 सामन्यात 10230 धावा केल्या आहेत. यामध्ये 222 ही त्यांची सर्वोत्कृष्ट खेळी होती. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 25 शतकं आणि 56 अर्धशतकं केली आहेत.























