U19 World Cup 2024 IND vs AUS : कैफपासून कोहलीपर्यंत! भारतीय कर्णधार फायनलमध्ये फ्लॉप ठरले; यंदाही 'उदय' झालाच नाही
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला एकतर्फी लढतीत पराभूत केले. या सामन्यात भारतीय कर्णधार उदय सहारन अवघ्या 8 धावा करून बाद झाला. उदयच्या नावावर नको असलेला रेकॉर्ड नोंदवण्यात आला.
U19 World Cup 2024 IND vs AUS : अंडर-19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला एकतर्फी लढतीत पराभूत केले. या सामन्यात भारतीय कर्णधार उदय सहारन अवघ्या 8 धावा करून बाद झाला. उदयच्या नावावर नको असलेला रेकॉर्ड नोंदवण्यात आला. फायनलमध्ये विशेष काही करू न शकलेल्या कर्णधारांच्या यादीत तोही सामील झाला आहे. या यादीत मोहम्मद कैफ आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूंचाही समावेश आहे.
This is an excellent graphic.
— Johns. (@CricCrazyJohns) February 11, 2024
The amount of cricketers from U-19 is going to play in the Senior team. pic.twitter.com/AyI3g9vdZH
अंडर-19 विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या इतिहासावर नजर टाकली तर उन्मुक्त चंद वगळता अन्य एकाही कर्णधाराला अंतिम फेरीत यश मिळवता आलेले नाही. विराट कोहली, मोहम्मद कैफ आणि पृथ्वी शॉ यांच्यासह सर्व कर्णधारांनी फायनलमध्ये लवकर विकेट गमावल्या. या यादीत उदय सहारनच्या नावाचाही समावेश झाल आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात तो 18 चेंडूंत 8 धावा करून बाद झाला होता. या डावात उदयने एकही चौकार लगावला नाही.
- 6 ODI World Cups.
— Johns. (@CricCrazyJohns) February 11, 2024
- 4 U-19 World Cups.
- 2 Champions Trophy.
- 1 T20 World Cup.
- 1 World Test Championship.
14th Trophy for the Australian Men's team. 🫡🏆 pic.twitter.com/z94LuCgbKd
2000 च्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत मोहम्मद कैफने भारताचे नेतृत्व केले होते. अंतिम फेरीत तो 18 धावा करून बाद झाला. रविकांत 2006 मध्ये भारताचा कर्णधार होता. तो केवळ 1 धाव करून पॅव्हेलियनमध्ये परतला. 2008 मध्ये विराट कोहलीने कर्णधारपद भूषवले होते. तो 19 धावा करून बाद झाला. इशान किशनने 2016 मध्ये कर्णधारपद भूषवले होते. अंतिम सामन्यात तो 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. 2018 मध्ये पृथ्वी शॉ 29 धावा करून बाद झाला होता. प्रियम गर्ग 2020 मध्ये 7 धावा करून निघून गेला. यश धुलने 2022 मध्ये 17 धावा केल्यानंतर त्याची विकेट गमावली.
अंडर 19 वर्ल्ड कप 2024 च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 253 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाला केवळ 174 धावा करता आल्या. टीम इंडियाला 79 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारताकडून आदर्श सिंहने 47 धावांची खेळी केली. अभिषेकने 42 धावांचे योगदान दिले.
इतर महत्वाच्या बातम्या