FIFA World Cup 2022: स्टार फुटबॉलर रॉबर्ट लेवनडोस्की पोलंडला घेऊन उतरणार मैदानात, कसा आहे संघ, कोणाशी असणार सामना?
Poland Football Team: फिफा फुटबॉल विश्वचषकासाठी (Football World Cup) आता पोलंड संघाने आपल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.
![FIFA World Cup 2022: स्टार फुटबॉलर रॉबर्ट लेवनडोस्की पोलंडला घेऊन उतरणार मैदानात, कसा आहे संघ, कोणाशी असणार सामना? FIFA WC 2022 Poland FIFA World Cup 2022 squad Star footballer robert lewandowski to lead team know details FIFA World Cup 2022: स्टार फुटबॉलर रॉबर्ट लेवनडोस्की पोलंडला घेऊन उतरणार मैदानात, कसा आहे संघ, कोणाशी असणार सामना?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/14/1fcddf02f139b183c1c1a78b9a642a811668435958522323_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Fiifa WC Poland Football Team : यंदाचा फिफा फुटबॉल विश्वचषक (Football World Cup) पोलंड संघाला जिंकवून देण्यासाठी फुटबॉल जगतातील स्टार फुटबॉलर रॉबर्ट लेवनडोस्की (robert lewandowski) सज्ज झाला आहे. 1980 च्या दशकात फुटबॉल विश्वचषकात चमकदार कामगिरी करणाऱ्या पोलंडसाठी गेली तीन दशकं खास गेलेली नाहीत. या संघाने 1990 ते 2018 या कालावधीत झालेल्या 8 पैकी 5 विश्वचषक स्पर्धेतच पात्रता मिळवली आहे. त्यात ज्या तीन विश्वचषकांमध्ये प्रवेश मिळवला त्यातही ती प्रत्येक वेळी ग्रुप स्टेजमधून बाहेर पडली आहे. यंदा हा संघ ग्रुप स्टेजमध्येच बाद होऊ नये यासाठी स्टार खेळाडू लेवनडोस्की जीवाचं रान करणार हे नक्की!
पोलंडचा संघ फिफा विश्वचषक 2022 च्या C गटात आहे. येथे त्याच्यासोबत सौदी अरेबिया, मेक्सिको आणि अर्जेंटिना हे संघ आहेत. अव्वल 2 संघच पुढील फेरी गाठू शकतील. अशा स्थितीत पोलंडला अर्जेंटिनावर मात करावी लागेल, त्याचप्रमाणे मेक्सिकोचे आव्हानही त्यांच्यासमोर असेल. फिफा क्रमवारीत अर्जेंटिना तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर मेक्सिको 13 व्या स्थानावर आहे. अशा स्थितीत 26व्या क्रमांकावर असलेल्या पोलंडला 16 फेरी गाठण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे.
कसा आहे पोलंडचा संघ?
गोलकीपर्स: वोज्शिच श्जान्सी, बार्टलोमिज ड्रॅगोव्स्की, लुकास स्कोरुप्स्की.
डिफेंडर्स: जेन बेडनारेक, कामिल ग्लिक, रॉबर्ड गमनी, आर्टर जेद्रझेजविक, जेकब किव्हियर, माटेउझ विएत्स्का, बार्टोझ बेरेस्झिन्स्की, मॅटी केश, निकोला झेलेस्की.
मिडफील्डर्स: क्रिस्टियन बिलिक, प्रझेमिसॉ फ्रँकोव्स्की, कामिल ग्रोसिस्की, जॉर्ग क्रिचोवी, जेकब कामिन्स्की, मायकेल स्कोरस, डॅमियन शिमान्स्की, सेबॅस्टियन शिमान्स्की, प्योटर झेलिंस्की, झिमॉन जुर्कोव्स्की.
फॉरवर्ड्स: रॉबर्ड लेवनडोस्की, अर्काडियस मिलिक, क्रिझिस्टोफ पिटक, कॅरोल स्विडर्स्की.
कधी, कुठे पाहाल सामने?
फिफा विश्वचषकाचे सर्व सामने कतारच्या वेगवेगळ्या आठ स्टेडियममध्ये खेळवले जातील. संपूर्ण विश्वचषकात 64 सामने होणार आहेत. अंतिम-4 मध्ये पोहोचणारे संघ 7-7 सामने खेळतील. Viacom-18 कडे भारतातील FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio TV वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)