FIFA World Cup 2022: डेन्मार्कचा संघ फिफा विश्वचषक 2022 साठी सज्ज, जाहीर केला संघ, पाहा कोणा-कोणाला मिळाली संधी?
FIFA WC 2022 : फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेसाठी डेन्मार्कचा संघ सज्ज झाला असून ग्रुप D मधून ते खेळणार आहेत. त्यांनी नुकताच संघ जाहीर केला आहे.
Team Denmark for Fifa World Cup 2022 : फुटबॉल जगतात एक अव्वल दर्जाच्या संघापैकी एक असलेला डेन्मार्कचा संघ (Denmark Team) आजपर्यंत फिफा विश्वचषकाच्या (Fifa World Cup) उपांत्य फेरीपर्यंतही पोहोचू शकलेला नाही. पण यंदा संघात एकापेक्षा एक स्टार खेळाडू असल्याने संघ आपल्या पहिल्या वहिल्या विश्वचषक ट्रॉफीचे स्वप्न पूर्ण करेल अशी आशा आहे. त्यांनी नुकताच आपला संघही जाहीर केला आहे.
डेन्मार्क सध्या फिफा क्रमवारीत 10 व्या स्थानावर आहे. या संघात ख्रिश्चन एरिक्सन, युसूफ पॉलसन, केस्पर श्मिएल आणि हॉसबर्ग यांच्यासह अनेक स्टार खेळाडू आहेत. त्यामुळे यंदा संघाकडून खूप अपेक्षा आहेत. 92 वर्षांच्या फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात डेन्मार्क पहिल्यांदा 1986 मध्ये मैदानात उतरला होता. आतापर्यंत या संघाने 5 विश्वचषक खेळले आहेत. 1998 मध्ये फ्रान्समध्ये झालेल्या विश्वचषकात डेन्मार्कने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. या संघाची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. गेल्या विश्वचषकात हा संघ राऊंड ऑफ 16 मधूनच बाहेर पडला होता. दरम्यान यंदाच्या विश्वचषकासाठी (FIFA World Cup Qatar 2022) नेमका डेन्मार्कचा संघ कसा आहे पाहूया...
कसा आहे डेन्मार्कचा संघ?
गोलकीपर्स : केस्पर श्माइकल, ओलिवर क्रिस्टनसन, फ्रेडरिक रोनोऊ
डिफेंडर्स : सिमोन केजर, जोकिम एंडरसन, जोकिम माहले, एंड्रिआज क्रिस्टनसन, रासमस क्रिस्टनसन, जेंस स्ट्रीगर, विक्टर नेल्सन, डेनियल वास, अलेक्झांडर बाह.
मिडफील्डर्स : थॉमस डिलेनी, माथियास जेन्सन, क्रिस्टन एरिक्सन, पीएर-एमिले होजबर्ग, क्रिस्टन नॉरगार्ड, रॉबर्ट स्कोव.
फॉरवर्ड्स : अँड्रिआस स्कोव ओल्सन, जेस्पर लिंडस्ट्रोम, अँड्रिआस कोर्नेलियस, मार्टिन ब्रेथवेट, केस्पर डोलबर्ग, मिकेल डेम्सगार्ड, जोनास विंड, युसूफ पॉलसन.
Fifa वर्ल्ड कपचं वेळापत्रक कसं?
ग्रुप स्टेजचे सामने 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान खेळवले जातील. पहिल्या दिवशी एक आणि त्यानंतर दररोज दोन ते चार सामने होतील. 3 ते 6 डिसेंबर दरम्यान राऊंड ऑफ-16 चे सामने होणार आहेत. त्यानंतर 9 आणि 10 डिसेंबरला उपांत्यपूर्व फेरी, 13 आणि 14 डिसेंबरला उपांत्य फेरी, 17 डिसेंबरला तिसऱ्या क्रमांकाची लढत आणि 18 डिसेंबरला अंतिम फेरी होईल. या सर्व सामन्यांसाठी 5 वेगवेगळ्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8.30, 9.30, 12.30, दुपारी 3.30 आणि सायंकाळी 6.30 वाजता सुरू होतील.
कुठे होणार सामने?
हे सर्व सामने कतारच्या वेगवेगळ्या आठ स्टेडियममध्ये खेळवले जातील. संपूर्ण विश्वचषकात 64 सामने होणार आहेत. अंतिम-4 मध्ये पोहोचणारे संघ 7-7 सामने खेळतील.
लाइव्ह टेलिकास्ट आणि स्ट्रीमिंग कुठे बघू शकता?
Viacom-18 कडे भारतातील FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio TV वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
हे देखील वाचा-
FIFA WC 2022: 56 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी इंग्लंड मैदानात उतरणार, जाणून घ्या संघ आणि वेळापत्रक