Qatar vs Ecuador FIFA WC : फिफामध्ये इक्वाडोरची विजयी सुरुवात, यजमान कतारवर 2-0 नं मात
FIFA World Cup 2022: फिफाच्या ओपनिंग सेरेमनीनंतर इक्वॉडोर विरुद्ध कतार सामन्यात पहिल्या हाफमध्येच 2-0 अशी आघाडी घेत, इक्वाडोरनं कतारवर दबाव निर्माण केला होता.
FIFA World Cup 2022: फिफा वर्ल्ड कप 2022 च्या (FIFA World Cup) महासंग्रामाला सुरुवात झाली आहे. काल दिमाखदार ओपनिंग सेरेमनीनंतर इक्वाडोर विरुद्ध कतार (Qatar vs Ecuador) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात इक्वाडोरनं कतारवर दमदार मात केली. FIFA विश्वचषक 2022 ला सुरुवातीलाच पहिल्या सामन्यात इक्वाडोरने यजमान कतारचा 2-0 असा पराभव करत शानदार सुरुवात केली. पूर्वार्धातच इक्वेडोरनं 2-0 अशी आघाडी घेतली होती. एनर व्हॅलेन्सियाने इक्वाडोरसाठी दोन्ही गोल केले आणि आपल्या संघाला सामना जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यासह व्हॅलेन्सिया विश्वचषकात चार गोल करणारा इक्वाडोरचा पहिला खेळाडू ठरला आहे.
इक्वाडोरनं पूर्वार्धात दोन गोल डागले
सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला इक्वाडोरनं गोल डागत कतारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण रेफरीनं VAR द्वारे गोल रद्द झाल्याचं घोषित केलं. हा गोल व्हॅलेन्सियानं केला होता. त्यानंतर याच सामन्याच्या 16व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचं गोलमध्ये रूपांतर करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. 31व्या मिनिटाला व्हॅलेन्सियानं शानदार हेडर करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. कतारच्या डिफेन्सच्या चुकीमुळेच इक्वाडोरला दुसरा गोल डागण्याची संधी मिळाली.
Never too early to celebrate being top of the group 🇪🇨🔝#Qatar2022 | #FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) November 20, 2022
सेकंड हाफमध्ये कतारची कडवी झुंज
सेकंड हाफमध्ये कतारनं इक्वाडोरला पूर्वार्धाच्या तुलनेत कडवी झुंज दिल्याचं पाहायला मिळालं. कतारनं डिफेंडकरत गोल करण्याचे प्रयत्न केले. पण त्यांचा प्रयत्वन इक्वॉडोरनं सफल होऊ दिले नाहीत. सामन्याच्या 67व्या मिनिटाला पेड्रो मिगुएलने कतारसाठी गोल डागण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या पदरी अपयशच आलं. इक्वाडोरचं प्रसंगावधान आणि उत्तम डिफेंट यामुळे यजमान कतारला पहिल्याच सामन्यात परभवाचा सामना करावा लागला. शेवटच्या काही मिनिटांत कतारचा संघ अधिक आक्रमक दिसला, तर सामन्याच्या पूर्वाधापासूनच आघाडीवर असलेला इक्वाडोर फुटबॉल संघ डिफेंन्सच्या भूमिकेत पाहायला मिळाला.
फिफाचे सामने कुठे पाहाल?
दरम्यान, काल दिमाखदार ओपनिंग सेरेमनीनंतर फिफाचा महासंग्राम सुरु झाला आहे. यंदा फिफाचं आयोजन कतारमध्ये करण्यात आलं आहे. फिफाचे सामने कुठे पाहायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर यंदा Viacom-18 कडे भारतातील FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio TV वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :