(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Qatar vs Ecuador FIFA WC: ग्रँड ओपनिंग सेरेमनी, त्यानंतर यजमान कतार आणि इक्वेडोर यांच्यात रंगणार सलामीचा सामना
Fifa WC 2022 : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा आजपासून सुरु होत असून सलामीचा सामना यजमान संघ कतार आणि इक्वेडोर यांच्यात होत आहे.
Fifa World Cup 2022 : बहुप्रतिक्षीत फिफा विश्वचषक स्पर्धेचा (Fifa WC) सलामीचा सामना आज तब्बल 60,000 प्रेक्षक क्षमतेच्या अल बेट स्टेडियमवर होणार आहे. आधी जवळपास दोन तास उद्घाटन सोहळा चालणार असून त्यानंतर यजमान संघ कतार आणि इक्वेडोरचे (Qatar vs ecuador) आमनेसामने असतील. दोघांचा खेळ आणि फॉर्म पाहता एक अटीतटीचा सामना आज पाहायला मिळू शकतो.
दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत तीन सामने झाले आहेत. यामध्ये एक सामना कतारने जिंकला असून एक सामना इक्वेडोरने जिंकला आहे. त्याच वेळी, एक सामना टाय देखील झाला आहे. म्हणजेच दोन्ही संघ हेड टू हेड रेकॉर्डच्या बरोबरीवर आहेत. त्यानंतर दोन्ही संघांच्या फिफा क्रमवारीत फारसा फरक नाही. कतारचा संघ फिफा क्रमवारीत 51व्या स्थानावर आहे, तर इक्वेडोरचा संघ 46व्या क्रमांकावर आहे.
कोणत्या खेळाडूंवर असेल नजर?
इक्वेडोरकडे लेफ्ट बॅकमध्ये पारविस स्टुपिनेन, मिडफिल्डमध्ये मॉइसेस कैसेडो आणि फॉरवर्डमध्ये इनर व्हॅलेन्सियासारखे स्टार खेळाडू आहेत. हे तीन खेळाडू इक्वेडोरसाठी सर्वात महत्त्वाच्या भूमिकेत असतील. दुसरीकडे, कतारकडे हसन अल हदोस आणि अल्मोज अलीसारखे स्ट्रायकर आहेत. या संघात साद अल शीबसारखा मजबूत गोलकीपरही आहे.
कुठे पाहाल सामने?
Viacom-18 कडे भारतातील FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio TV वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
ग्रँड ओपनिंगने सुरु होणार विश्वचषक!
फिफा विश्वचषक स्पर्धेची ग्रँड ओपनिंग सेरिमनी (FIFA Opening Ceremony) ही लवकर पार पडणार आहे. या ग्रँड ओपनिंगला अनेक सेलिब्रिटी परफॉर्म करणार आहेत. यामध्ये जगप्रसिद्ध कोरियन बँड (K-pop Band) बीटीएसमधील सदस्य जंगकूक हा उद्घाटन समारंभात परफॉर्म करणार आहे. तसंच भारतीय अभिनेत्री नोरा फतेहीचा फिफा विश्वचषकच्या ग्रँड ओपनिंगचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी अनेक लोक उत्सुक आहेत. निकी मिनाज सारख्या प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत तिने या वर्षी “लाइट द वर्ल्ड” या अधिकृत फीफा एनथममध्ये देखील काम केले. याशिवाय कोलंबियन गायक जे बाल्विन, नायजेरियन गायक आणि गीतकार पॅट्रिक नेमेका ओकोरी हे देखील फिफा विश्वचषक 2022 च्या उद्घाटन समारंभात परफॉर्म करणार आहेत. अमेरिकन रॅपर लिल बेबीनं सप्टेंबरच्या अखेरीस विश्वचषक 2022 चे अधिकृत गीत रिलीज केले. लिल बेबी देखील फिफाच्या ग्रँड ओपनिंगमध्ये परफॉर्म करणार आहे.
हे देखील वाचा-