एक्स्प्लोर

FIFA 2018 : इंग्लिश आर्मी vs क्रोएशियन फौज, कोण जाणार फायनलमध्ये?

रशियातल्या ल्युझनिकी स्टेडियमवर इंग्लंड आणि क्रोएशिया संघांमधून फायनलचं तिकीट कोण कन्फर्म करणार, याची जगभरातल्या फुटबॉलरसिकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

मोस्को (रशिया) : फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचा दुसरा सामना आज रंगणार आहे. सामन्यात हॅरी केनच्या इंग्लिश आर्मीची गाठ ल्युरा मॉडरिचच्या क्रोएशियन फौजेबरोबर पडणार आहे. हा सामना रात्री साडेअकरा वाजता रशियातल्या ल्युझनिकी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात फ्रान्सनं बेल्जियमला धूळ चारत रशियातल्या फिफा विश्वचषकात फायनलमेध्य धडक मारली आहे. त्यामुळं आता इंग्लंड आणि क्रोएशिया या दोन संघांमधून फ्रान्ससमोर उभं कोण ठाकतं, याविषयी फुटबॉलविश्वात उत्सुकता निर्माण झाली आहे. इंग्लंड आणि क्रोएशियाचा इतिहास आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या आजवरच्या इतिहासात इंग्लंड आणि क्रोएशियाच्या फौजा सातवेळा एकमेकांना भिडल्या आहेत. त्यात इंग्लंडनं चारवेळा बाजी मारली आहे, तर केवळ एकच सामना क्रोएशियाला जिंकता आला आहे. यंदा फिफा विश्वचषकाच्या मैदानात हे दोन संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. यंदाच्य़ा विश्वचषकातील इंग्लंडची कामगिरी प्रशिक्षक गेरेथ साऊथगेटच्या इंग्लंडनं यंदाच्या विश्वचषकात जगाला आपली दखल घ्यायला भाग पाडलं आहे. इंग्लंडनं गटात तीनपैकी दोन सामने जिंकून बाद फेरी गाठली. त्यानंतर उपउपांत्यपूर्व फेरीत कोलंबियाचं आणि उपांत्यपूर्व फेरीत स्वीडनचं आव्हान मोडीत काढून हॅरी केनचा संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आलाय. यंदाच्य़ा विश्वचषकातील क्रोएशियाची कामगिरी ल्युका मॉडरिचच्या क्रोएशियानं ‘ड’ गटात तीनपैकी तीन सामने जिंकून अव्वल स्थान राखल आहे. क्रोएशियानं नायजेरियाचा 2-0, आईसलँडचा 2-1 आणि बलाढय अर्जेंटिनाचा 3-0 असा पराभव केला होता. क्रोएशियाला उपउपांत्यपूर्व आणि उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये मात्र विजयासाठी झुंजावं लागलं. डेन्मार्क आणि रशियाविरुद्धच्या या दोन्ही सामन्यांत क्रोएशियाच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं ते पेनल्टी शूटआऊटवर. त्यामुळं आता इंग्लंडविरुद्धच्या लढाईत बाजी मारायची असेल तर मॉडरिच आणि त्याच्या शिलेदारांना रणनीती आखावी लागणार आहे. मॉडरिचच्या क्रोएशियासमोरील आव्हानं मॉडरिचच्या संघासमोर सर्वात मोठं आव्हान आहे ते हॅरी केनचं. यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक गोलसाठीच्या गोल्डन बूटच्या शर्यतीत हॅरी केन आघाडीवर आहे. हॅरी केननं आतापर्यंत चार सामन्यात सहा गोल झळकावले आहेत. त्यात साखळी सामन्यातल्या एका हॅटट्रिकचाही समावेश आहे. त्यामुळे केनला रोखणं क्रोएशियाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. याशिवाय रहिम स्टर्लिंग, मार्कस रॅशफर्ड, जॉर्डन हेण्डरसन, एरिक डायर यांचं आक्रमण थोपवणं हेही क्रोएशियासमोरचं आव्हान असेल. क्रोएशियाचा ताफा क्रोएशियाच्या ताफ्यात कर्णधार ल्युका मॉडरिचसह डोमॅगोज विडा, जोसिप पिवारिच, इवान रॅकेटिच, मिलान बेडेल, मारियो मानझुकीच यांच्यासारखे युवा शिलेदार आहेत. पेनल्टी शूटआऊटवरच्या दोन्ही विजयांमध्ये निर्णायक कामगिरी बजावणारा गोलरक्षक डॅनिएल सुबासिचवरही क्रोएशियाची मदार राहिल. इंग्लंडने आजवरच्या इतिहासात 1966 साली फिफा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. आता तब्बल 52 वर्षांनी इंग्लंडला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची नामी संधी चालून आली आहे. क्रोएशिया तर आपल्या पहिल्यावहिल्या विश्वचषकासाठी उत्सुक आहे. रशियातल्या ल्युझनिकी स्टेडियमवर इंग्लंड आणि क्रोएशिया संघांमधून फायनलचं तिकीट कोण कन्फर्म करणार, याची जगभरातल्या फुटबॉलरसिकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 1st Test 2nd Day : निकोल्सची बॅट थांबेना, फिलिप्सनेही गाजवलं मैदान! न्यूझीलंडने टीम इंडियाच्या गोलंदाजांना रडवलं, दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात काय घडलं?
निकोल्सची बॅट थांबेना, फिलिप्सनेही गाजवलं मैदान! न्यूझीलंडने टीम इंडियाच्या गोलंदाजांना रडवलं, दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात काय घडलं?
युझवेंद्र चहलने रचला इतिहास! असा पराक्रम करणारा तो ठरला पहिलाच गोलंदाज, नेमका काय आहे विक्रम? 
युझवेंद्र चहलने रचला इतिहास! असा पराक्रम करणारा तो ठरला पहिलाच गोलंदाज, नेमका काय आहे विक्रम? 
IND vs NZ : मोहम्मद सिराजला पहिल्या कसोटीबाहेर ठेवल्यानं माजी क्रिकेटपटूंची टीकेची झोड, अखेर टीम इंडियाच्या प्रशिक्षकानं उत्तर दिलं...
भारताची दमदार सुरुवात पण न्यूझीलंडचा पलटवार, सिराजला संघाबाहेर ठेवल्यानं वादाचा भडका, भारताचा कोच म्हणाला...
Kushal Badrike on Shourya Ambure: युथ ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकीचा डंका, कुशल बद्रिकेनं केलं कौतुक; 'शौर्या' नावावरुन नेमकं काय म्हणाला?
युथ ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकीचा डंका, कुशल बद्रिकेनं केलं कौतुक; 'शौर्या' नावावरुन नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Embed widget