एक्स्प्लोर
FIFA World Cup 2018 : ऑस्ट्रेलियानं डेन्मार्कला बरोबरीत रोखलं
ऑस्ट्रेलियाला सलामीच्या सामन्यात फ्रान्सकडून १-२ अशी हार स्वीकारावी लागली होती.

रशिया : कर्णधार माईल जेडिनाकनं नोंदवलेला गोल ऑस्ट्रेलियासाठी मोलाचा ठरला. त्याच्या याच गोलच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं विश्वचषकातल्या दुसऱ्या साखळी सामन्यात डेन्मार्कला १-१ असं बरोबरीत रोखलं. पण या बरोबरीनंतरही ऑस्ट्रेलियाचं बाद फेरीचं तिकीट कन्फर्म होऊ शकलेलं नाही. ऑस्ट्रेलियाला सलामीच्या सामन्यात फ्रान्सकडून १-२ अशी हार स्वीकारावी लागली होती. त्यामुळे विश्वचषकाच्या क गटातून डेन्मार्क आणि फ्रान्सला बाद फेरीचं तिकीट मिळवण्याची अधिक संधी आहे. दरम्यान, आजच्या सामन्यात ख्रिस्तियन एरिकसननं सातव्या मिनिटालाच डेन्मार्कचं खातं उघडलं होतं. त्यानंतर माईल जेडिनाकनं ३८व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाला बरोबरी साधून दिली.
आणखी वाचा























