एक्स्प्लोर
ड्वेन स्मिथचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
मुंबई/दुबई : स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर खेळाडू ड्वेन स्मिथने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने वेस्ट इंडिजकडून अखेरचा वन डे सामना 2015 च्या विश्वचषकात खेळला होता. तर अखेरची कसोटी 2006 साली खेळली होती.
ड्वेन सध्या दुबईत चालू असलेल्या पाकिस्तान सुपर लीगमधील इस्लामाबाद युनायटेड संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. पाकिस्तान सुपर लीगच्या सेमीफायनलनंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली.
वेस्ट इंडिज संघात शतकी खेळीने कारकीर्दीची सुरवात करणाऱ्या ड्वेनला आपल्या 10 कसोटीच्या छोट्या कार्यकाळात खास छाप सोडता आली नाही. मात्र टी-20 मध्ये त्याने आपलं स्थान निर्माण केलं होतं.
दरम्यान वेगवेगळ्या देशात खेळल्या जाणाऱ्या लीगमध्ये ड्वेन खेळत राहणार आहे. आयपीएलमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली तो सध्या आयपीएल टीम गुजरात लायन्स संघाचं प्रतिनिधित्व करत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement