एक्स्प्लोर
रिओ ऑलिम्पिक : भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची फायनलमध्ये धडक
रिओ दी जनैरो : रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकरनं फायनल गाठून नवा इतिहास घडवला आहे. दीपा कर्माकरनं व्हॉल्ट प्रकारात 14.850 गुणांची कमाई करुन आठवं स्थान मिळवलं आणि फायनलमधील आपलं स्थानही पक्क केलं.
दीपानं व्हॉल्ट प्रकारात पहिल्या प्रयत्नातच 15.100 गुणांची कमाई केली. तर दुसऱ्या प्रयत्नात दीपानं 14.600 गुणांची वसुली केली.
ऑलिम्पिक गाठणारी पहिलीच भारतीय महिला जिम्नॅस्ट
महिलांच्या व्हॉल्ट प्रकाराची फायनल 14 ऑगस्टला रात्री 11.15 वाजता खेळवली जाईल. 22 वर्षीय दीपा ऑलिम्पिक गाठणारी पहिलीच भारतीय महिला जिम्नॅस्ट ठरली आहे. त्यामुळं दीपाची ही कामगिरी कौतुकास्पद आहे.
दीपा कर्माकरचं अनइव्हन बार, बॅलन्सिंग बिम आणि फ्लोअर एक्सरसाईजमधील आव्हान मात्र संपुष्टात आलं. दीपानं अनइव्हन बारमध्ये 11.666, बॅलन्सिंग बिममध्ये 12.866 आणि फ्लोअर एक्सरसाईजमध्ये 12.033 गुणांची कमाई केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement