एक्स्प्लोर
न्यूझीलंडचा कर्णधार रॉस टेलरची हिंदीत शिवी

कोलकाताः भारताने दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंड संघाला धूळ चारत 196 धावांनी विजयावर शिक्कामोर्तब केलं. मात्र या सामन्यात अशी एक गोष्ट घडली, ज्याचा कोणी विचारही केला नसेल. न्यूझीलंडचा कर्णधार रॉस टेलरने या सामन्यादरम्यान चक्क हिंदीत शिवा दिली. विराट कोहली खेळत असताना न्यूझीलंड संघाने जोरदार अपील केली. मात्र अपीलकडे अम्पायरने दुर्लक्ष केलं. त्यानंतर टेलरला संताप अनावर झाला आणि तोंडातून शिवी बाहेर पडली. एरवी मैदानात रागात असणारा विराट यावेळी मात्र शांत दिसत होता. तर शांत स्वभावाच्या टेलरने हिंदीत शिवी दिली. कदाचित विराटने ही शिवी ऐकली नसावी. पाहा व्हिडिओः
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























