एक्स्प्लोर

धडाकेबाज धोनीची नव्या विक्रमाला गवसणी  

मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत महेंद्रसिंह धोनीनं 79 धावा करत टीम इंडियाला सावरलं. याचबरोबर त्यानं एक मोठा विक्रमही रचला.

चेन्नई : भारतानं पहिल्याच वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. काल (रविवारी) झालेल्या सामन्यात हार्दिक पांड्या आणि एमएस धोनीच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर भारतानं 281 धावांपर्यंत मजल मारली. मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत धोनीनं 79 धावा करत टीम इंडियाला सावरलं. याचबरोबर त्यानं एक मोठा विक्रमही रचला. या सामन्यात 79 धावा करत धोनीनं मायदेशात 4000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. मायदेशात 4000 धावा करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी फक्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं भारतात 4000 धावा केल्या होत्या. त्यामुळे आता धोनी थेट सचिनच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. कारण, या दोघांशिवाय असा विक्रम अद्याप कोणत्याही भारतीय क्रिकेटरनं केलेला नाही. यासोबतच धोनी जगातील दुसरा विकेटकीपर आहे की, ज्याने मायदेशात 4000 धावा केल्या आहेत. याआधी हा विक्रम फक्त श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावावर जमा होता. याचबरोबर धोनीनं यावेळी आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डेत अर्धशतक झळकावून, आजवरच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत अर्धशतकांचं शतक साजरं केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात अर्धशतकांचं शतक झळकावणारा धोनी हा भारताचा चौथा आणि जगभरातला तेरावा फलंदाज ठरला. धोनीच्या नावावर कसोटीत 33, वन डेत 66 आणि ट्वेन्टी ट्वेन्टीत एक अशी मिळून 100 आंतरराष्ट्रीय अर्धशतकं आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सचिन तेंडुलकरनं सर्वाधिक 164, राहुल द्रविडनं 146 आणि सौरव गांगुलीनं 107 अर्धशतकं फटकावली आहेत. धोनी आता त्या तिघांच्या पंक्तीत येऊन दाखल झाला आहे. दरम्यान, या सामन्यात सुरुवातीलाच भारतीय संघ गडगडला होता. 100 धावांच्या आतच भारतानं पाच गडी गमावले होते. त्यावेळी केदार जाधवनं 40 धावा करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण ऐनवेळी तो बाद झाला. त्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्यानं हळूहळू सुरुवात करत भारतीय संघाच्या डावाला आकार दिला. त्यानं 83 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. धोनीनंही एक बाजू लावून धरली. या सामन्यात शेवटच्या षटकापर्यंत धोनीनं फलंदाजी करत भारताला 280 धावांचा टप्पा पार करुन दिला. संबंधित बातम्या : धोनीचा नवा विक्रम, अर्धशतकांचं शतक पूर्ण! #IndVsAus : चेन्नई वनडेमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखलDevendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Embed widget