एक्स्प्लोर
Advertisement
BCCI ची यादी जाहीर, कोहलीपेक्षा धवनची कमाई जास्त!
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली जाहिरातीमधून सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू असला तरी, बीसीसीआयकडून मिळणाऱ्या करमुक्त मानधनाच्या बाबतीत तो शिखर धवनपेक्षा मागे पडला आहे. 2015-16 या मोसमात टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन हा कोहलीपेक्षा वरचढ ठरला आहे.
बीसीसीआयने 25 लाखांपेक्षा अधिक मानधन मिळणाऱ्या खेळाडूंची यादी वेबसाईटवर प्रकाशित केली. त्यानुसार धवनला वर्षभरासाठी 87.76 लाख तर कोहलीला 83.06 लाख इतकी रक्कम मिळाली.
याबाबतीत अजिंक्य रहाणे 81.06 लाख रुपयांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर त्याच्यानंतर रोहित शर्मा आणि रवीचंद्रन अश्विनचा नंबरल आहे. 73.02 लाख रुपयांसह दोघेही संयुक्तरित्या चौथ्या स्थानावर आहे. सर्वात शेवटी वरुण अॅरॉन असून त्याला 32.15 लाख रुपये मिळाले आहेत.
खेळाडूंना मागील मायदेशात खेळावण्यात आलेल्या सामन्यांचीही फी मिळाली आहे. न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यावर झालेल्या तीन मालिकांमधील मॅच फी देण्यात आली आहे. करमुक्त मानधनाशिवाय खेळाडूंच्या कसोटी रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या खेळाडूंना आयसीसीकडूनही इनाम मिळालं आहे.
डावखुरा गोलंदाज आशिष नेहराला आयपीएल 2016 मध्ये दुखापतीच्या नुकसानभरपाईच्या स्वरुपात 1 कोटी 52 लाखांचं मानधन मिळालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement