एक्स्प्लोर
रिओ पॅरालिम्पिकमध्ये दीपा मलिकला गोळाफेकीत रौप्यपदक
रिओ दी जनैरोः रिओ पॅरालिम्पिकच्या महिला गोळाफेक प्रकारात भारताच्या दिपा मलिकने रौप्य पदकाची कमाई केली आहे. दीपा मलिक ही पॅरालिम्पिकच्या इतिहासात पदकाची कमाई करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे.
दीपा मलिकच्या या कामगिरीने रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली. तिने महिलांच्या गोळाफेक प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. दीपाने 4.61 मीटर्स अंतरावर गोळा फेकून रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं. दीपा मलिकची 4.61 मीटर्स ही कामगिरी तिच्या कारकीर्दीतली आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे.
दरम्यान, बहारिनच्या फातेमा नेदामने 4.76 मीटर्स अंतराची नोंद करून सुवर्णपदकाची कमाई केली. ग्रीसच्या दिमित्रा कोरोकिडानं कांस्यपदक पटकावलं. रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आतापर्यंत एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक जमा झालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement