एक्स्प्लोर
पत्नीवरील शेरेबाजीमुळे वॉर्नर-डी कॉकमध्ये शाब्दिक चकमक?
काही मीडिया रिपोर्टनुसार, डी कॉकने वॉर्नरची पत्नी कॅन्डिस हिच्याबाबत काही आक्षेपार्ह शेरेबाजी केली होती. ज्यामुळे वॉर्नर प्रचंड भडकला होता.
![पत्नीवरील शेरेबाजीमुळे वॉर्नर-डी कॉकमध्ये शाब्दिक चकमक? david warner verbal exchange after de kock Comment latest update पत्नीवरील शेरेबाजीमुळे वॉर्नर-डी कॉकमध्ये शाब्दिक चकमक?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/07085817/aus-vs-SA.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामधील पहिल्या कसोटीदरम्यान ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि द. आफ्रिकेचा विकेटकिपर क्विटन डी कॉक यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. चहापानासाठी दोन्ही संघ ड्रेसिंग रुममध्ये जात असताना हा सर्व प्रकार घडला होता.
आता या प्रकरणाबाबत नवी माहिती समोर आली आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, डी कॉकने वॉर्नरची पत्नी कॅन्डिस हिच्याबाबत काही आक्षेपार्ह शेरेबाजी केली होती. ज्यामुळे वॉर्नर प्रचंड भडकला होता. वॉर्नर जवळजवळ डी कॉकच्या अंगावरच धावून गेला होता.
दरम्यान, यावेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने मध्यस्थी करत वॉर्नरला शांत करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी दोन्ही संघाचे अनेक खेळाडू वॉर्नरला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. पण डी कॉकच्या शेरेबाजीमुळे भडकलेला वॉर्नर वारंवार त्याच्या अंगावर धावून जात होता. यावेळी आफ्रिकेचा कर्णधार डुप्लेसीने मध्यस्थी केली होती. संबंधित बातम्या : वॉर्नर-डी कॉकमध्ये शाब्दिक चकमक, घटना सीसीटीव्हीत कैद@davidwarner31 and @QuinnyDeKock69 Verbal Exchange during Tea Break. #AUSvSA pic.twitter.com/6Rr4Xkx2lQ
— Thakur (@ThakurHassam) March 4, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
पुणे
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)