Pro Kabaddi League 2021 Schedule: कबड्डी-कबड्डी! दिल्लीच्या संघात धडाकेबाज खेळाडूंची ऐन्ट्री, कोणत्या दिवशी कुठल्या संघाशी भिडणार? पाहा
Pro Kabaddi League 2021 Schedule: प्रो-कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाला 22 डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. लीगचा पहिला सामना बेंगळुरू आणि मुंबई यांच्यात होणार आहे.
Pro Kabaddi League 2021 Schedule: कबड्डीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच त्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडूंना मैदानावर 'कबड्डी-कबड्डी' करताना पाहायला मिळणार आहे. प्रो-कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाला 22 डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. लीगचा पहिला सामना बेंगळुरू आणि मुंबई यांच्यात होणार आहे. कोरोना महामारीमुळं गेल्या वर्षी पीकेएल स्पर्धेच आयोजन करण्यात आलं नव्हतं. 12 संघांमधील रोमांचक लढतीबद्दल चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. दिल्लीच्या संघाला आजपर्यंत कधीही विजेतेपद मिळवता आलेले नाही. परंतु, या हंगामात दिल्लीच्या संघात धडाकेबाज खेळाडूंची एन्ट्री झाली आहे. यामुळं यंदाचा हंगाम दिल्लीच्या संघासाठी चांगला जाण्याची शक्यता आहे.
प्रो कबड्डी लीगमध्ये 20-20 मिनिटांचे दोन सत्र असतात. प्रत्येक संघाला सामन्यादरम्यान 5-5 पर्यायी खेळाडू देखील मिळतात. पूर्वार्धानंतर सर्व संघांना वेळ संपल्यानंतर कोर्ट बदलाव लागतं. रेफरीच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी संघाला सामन्यात एक रिव्ह्यूदेखील मिळतो.
दिल्लीचा संघ-
रिडर | डिफेंडर | अष्टपैलू |
अजय ठाकूर | सुमित | विजय कुमार |
आशु मलिक | जोगिंदर नरवाल (कर्णधार) | बलराम |
इमाद सेदाघटनिया | मोहित | संदीप नरवाल |
नवीन कुमार | मोहम्मद मलक | मनजीत चिल्लर |
नीरज नरवाल | जीवा कुमार | |
सुशांत सेल | रविंदर पहल | |
विकास |
दिल्ली कोणत्या दिवशी कुठल्या संघाशी भिडणार?
1) पुणे (23 डिसेंबर, रात्री 8:30 वाजता )
2) मुंबई (24 डिसेंबर, संध्याकाळी 7:30 वाजता )
3) गुजरात (26 डिसेंबर, संध्याकाळी 7:30 वाजता)
4) बंगाल (29 डिसेंबर, संध्याकाळी 7:30 वाजता)
5) तामिळनाडू (01 जानेवारी, रात्री 9:30 वाजता)
6) तेलंगणा (05 जानेवारी, रात्री 8:30 वाजता)
7) यूपी (08 जानेवारी, संध्याकाळी 7:30 वाजता)
8) जयपूर (10 जानेवारी, रात्री 8:30 वाजता)
9) बेंगळुरू (12 जानेवारी, रात्री 8:30 वाजता)
10) हरियाणा (15 जानेवारी, संध्याकाळी 7:30 वाजता)
11) पाटणा (18 जानेवारी, संध्याकाळी 7:30 वाजता)
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha