(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CWG 2022: निखत झरीन उपांत्यपूर्व फेरीत, शिव थापा आणि सुमित कुंडूच्या पदरात निराशा
Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ स्पर्धेचा तिसरा दिवस भारतासाठी चांगला ठरला. या स्पर्धेत अनेक भारतीय खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करत सर्वांचं लक्ष वेधलंय.
Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ स्पर्धेचा तिसरा दिवस भारतासाठी चांगला ठरला. या स्पर्धेत अनेक भारतीय खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करत सर्वांचं लक्ष वेधलंय. तर, काही खेळाडू या स्पर्धेत छाप सोडण्यास, आली नाही. विश्वविजेता भारताची बॉक्सर निखत झरीननं (Nikhat Zareen) महिला लाइटवेट 50 किलोग्राम वजन गटात चांगली कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिलीय. तर, शिव थापा (Shiva Thapa) (63.5 किलो वजन गटात) आणि सुमित कुंडू (Sumit Kundu) (75 किलो वजन गटात) यांना राऊंड 16 मध्ये पराभवचा सामना करावा लागला. ज्यामुळं दोघांचंही या स्पपर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय.
निखत झरीन सुवर्णपदक जिंकण्यासाठी उस्तुक
निखत झरीनं महिलांच्या लाइटवेट प्रकारात मोझांबिकच्या हेलेना इस्माईल बागाओचा पराभव करत अंतिम आठमध्ये प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत निखत झरीनचा सामना न्यूझीलंडच्या ट्रॉय गार्टेनशी सामना होईल. हेलेना इस्माईल बागाओला पराभूत केल्यानंतर निखत झरीन म्हणाली की, "पहिला सामना जिंकल्याचा मला आनंद आहे आणि पुढच्या फेरीत चांगली कामगिरी करण्यासाठी मी तयार आहे. मी पदकापासून फक्त एक सामना दूर आहे पण मी येथे सुवर्ण जिंकण्यासाठी उत्सुक आहे."
शिप थापा, सुमीत कुंडूची निराशाजक कामगिरी
दरम्यान, शिव थापाला जागतिक अजिंक्यपद कांस्यपदक विजेत्या स्कॉटलंडच्या रीस लिंचकडून 1-4 नं पराभव स्वीकारावा लागला. तसेच मिडलवेट प्रकारात ऑस्ट्रेलियाच्या कॅलम पीटर्सने सुमितला 5-0 नं पराभूत केलं. थापानं सामन्याच्या सुरुवातील चांगलं प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी खेळाडूवर दबाव निर्माण केला. परंतु, पुढच्या राऊंडमध्ये रीस लिंचनं जोरदार कमबॅक करत थापाला बॅकफूटवर ढकललं. त्यानंतर तिसऱ्या आणि अखेरच्या राऊंडमध्ये रीस लिंचनं आक्रमक खेळ केला आणि सामना जिंकला.
हे देखील वाचा-