(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CWG 2022: भारताच्या दुसऱ्या दिवशीचा संपूर्ण शेड्युल; कुठे, कधी आणि कोणाशी होणार सामने, कॉमनवेल्थमधील प्रत्येक खेळांची अपडेट
CWG 2022 Day 2 India Full Schedule: बर्मिंगहॅम येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अनेक भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी करून देशासाठी पदक जिंकण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
CWG 2022 Day 2 India Full Schedule: बर्मिंगहॅम येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अनेक भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी करून देशासाठी पदक जिंकण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. तर, काही भारतीय खेळाडूंच्या पदरी निराशा पडलीय. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आज दुसरा दिवस आहे. पहिल्या सामन्यात घानाचा 5-0 नं पराभव केल्यानंतर भारतीय हॉकी संघ आज वेल्सशी या स्पर्धेतील दुसरा सामना खेळणार आहे. महिलांच्या 49 किलो वजनी गटात ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानूकडून सुवर्णपदकाची अपेक्षा केली जात आहे. तर, भारतीय बॉक्सर लोव्हलिनावरही सर्वांचं लक्ष असेल. याशिवाय आज होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंचं वेळापत्रक कसं असेल? हे पाहुयात.
जलतरण स्पर्धा
पुरुषांची 200 मीटर फ्रीस्टाइल, हीट 3: कुशाग्र रावत - दुपारी 3.06 वाजता
पुरुषांची 100 मीटर बॅकस्ट्रोक फायनल - श्रीहरी नटराजन - दुपारी 1:35 वाजता
हॉकी
महिला पूल अ: भारत वि वेल्स (रात्री 11.30)
बॅडमिंटन
मिश्र सांघिक गट टप्पा-
अ गट: भारत विरुद्ध श्रीलंका - दुपारी 1.30 वाजता.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - रात्री 11.30 वाजता.
बॉक्सिंग
54 किलो - 57 किलो (फेदरवेट) फेरी 32: हुसामुद्दीन मोहम्मद - संध्याकाळी 5 वाजता
66 किलो - 70 किलो (हलके मध्यम वजन) फेरी 16: लोव्हलिना बोर्गोहेन - 12 वाजता
टेबल टेनिस
महिला गट 2: भारत विरुद्ध गयाना - दुपारी 2
पुरुष गट 3: भारत विरुद्ध उत्तर आयर्लंड - 4.30 pm
सायकलिंग
महिला स्प्रिंट पात्रता: मयुरी लट्टे, त्रियशा पॉल (दुपारी 02.30 ते संध्याकाळी 6.15)
महिलांची 3000 मीटर वैयक्तिक पर्स्युट पात्रता: मीनाक्षी ( दुपारी 2.30- संध्याकाळी 6.15 वाजता)
पुरुषांची केरिन पहिली फेरी: एसो अल्बेन (8.30 - 11.30 वाजता)
वेटलिफ्टिंग
पुरुष 55 किलो: संकेत सरगर (दुपारी 1.30 वाजता)
पुरुष 61 किलो: गुरुराजा (दुपारी 4.15 वाजता)
महिला 49 किलो: मीराबाई चानू (रात्री 8 वाजता)
महिला 55 किलो: एस. बिंदयाराणी देवी (रात्री 12:30 वाजता)
लॉन बॉल
पुरुषांची तिहेरी: भारत वि माल्टा (दुपारी 1- संध्याकाळी 6.15 वाजता)
महिला एकेरी: तानिया चौधरी विरुद्ध लॉरा डॅनियल्स (वेल्स): दुपारी 1 ते 6.15 वाजता.
पुरुषांची जोडी: भारत वि कुक आयलंड्स (संध्याकाळी 7.30 - दुपारी 12.45)
महिला चार: भारत विरुद्ध कॅनडा (संध्याकाळी 7.30 - दुपारी 12.45)
अॅथलेटिक्स आणि पॅरा अॅथलेटिक्स
पुरुषांची मॅरेथॉन फायनल: दुपारी 1.30 वाजता
हे देखील वाचा-
- Rohit Sharma Record : जागतिक क्रिकेटमध्ये रोहितचाच डंका, हिटमॅनच्या नावे आणखी एक रेकॉर्ड
- RIL IOA Partnership : रिलायन्सची भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनसोबत भागिदारी, 2024 ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच 'इंडिया हाऊस'
- CWG 2022 Day 1 Round Up : पहिला दिवस भारतासाठी ठरला दमदार! बॅडमिंटन, बॉक्सिंगमध्ये पाकिस्तानवर विजय, हॉकीमध्येही VICTORY