एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CWG 2018 : बीडच्या राहुलला सुवर्ण, कोल्हापूरच्या तेजस्विनीला रौप्य
21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताच्या पदकांची संख्या 29 वर पोहचली आहे.
सिडनी : पैलवान सुशीलकुमारने भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर घातली आहे. पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्तीत 74 किलो वजनी गटात सुशीलकुमारने सुवर्णपदकाची कमाई केली.
दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्स बोथावर 10-0 ने मात करत सुशीलकुमारने अवघ्या 80 सेकंदांत पदक खिशात घातलं.
21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताच्या पदकांची संख्या 29 वर पोहचली आहे.
यासोबतच सुशीलकुमारने राष्ट्रकुल स्पर्धेत एक विक्रमही आपल्या नावावर केला आहे. सलग तीन वेळा राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवण्याचा मान सुशीलने पटकावला.
2010 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत 66 किलो वजनी गटात, तर 2014 मध्ये 74 किलो वजनी वजनी गटात सुशीलकुमारने सुवर्णपदकाची कमाई केली होती.
बीडच्या सुपुत्राने सोनं जिंकलं
राष्ट्रकुल स्पर्धेच्या आठव्या दिवशी महाराष्ट्रातील क्रीडापटूंनी सुवर्णठसा उमटवला. बीडचा पैलवान राहुल आवारे आणि कोल्हापूरची नेमबाज तेजस्विनी सावंत यांनी सुवर्णपदक पटकावलं.
बीडचा पैलवान राहुल आवारेनेही महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्तीत 57 किलो वजनी गटात राहुलने सुवर्णपदकाची कमाई केली. कॅनडाच्या स्टीव्हन ताकाहाशीवर राहुलने 15-7 अशी मात केली.
बबिता फोगटनेही महिलांच्या फ्रीस्टाईल कुस्तीत 53 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. कॅनडाच्या डायना वेकरकडून तिला अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला. बबिता डायनाकडून 2-5 ने पराभूत झाली.
किरणकुमारीने महिलांच्या फ्रीस्टाईल कुस्तीत 76 किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली.
कोल्हापूरकन्या तेजस्विनीला रौप्य
महाराष्ट्राची कन्या तेजस्विनी सावंत-दरेकरनेही रौप्यपदकाची कमाई केली आहे. महिलांच्या 50 मीटर रायफल प्रोन प्रकारात तेजस्विनीने रौप्य पदक पटकावलं.
618.9 गुणांची कमाई करुन तेजस्विनीने दुसरा क्रमांक मिळवला, तर सिंगापूरच्या मार्टिना वेलोसेने गोल्ड मेडल पटकावलं. तेजस्विनीने 102.1, 102.4, 103.3, 102.8, 103.7, 104.6 अशी गुणांची कमाई केली होती.
रिओ ऑलिम्पिक्समधील निराशाजनक कामगिरीच्या आठवणी पुसून टाकण्याचा चंग तेजस्विनीने बांधला होता.
पदकविजेत्या खेळाडूंना रोख इनाम देण्याची घोषणा महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे बीडचा सुपुत्र राहुल आवारेला फडणवीस सरकारकडून सुवर्णपदकासाठी 50 लाखांचं, कोल्हापूरची कन्या तेजस्विनीला रौप्य पदकासाठी 30 लाख रुपयांचं रोख पारितोषिक प्राप्त होईल.
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये सुरु असलेल्या 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आतापर्यंत 29 पदकांची कमाई केली आहे. भारताने 14 सुवर्ण, 6 रौप्य आणि 9 कांस्य पदकांची कमाई केली आहे.
21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी
कुस्ती (पुरुष फ्रीस्टाईल कुस्ती 74 किलो वजनी गट) सुशीलकुमार सुवर्ण
कुस्ती (महिला फ्रीस्टाईल कुस्ती 76 किलो वजनी गट) किरण कांस्य
कुस्ती (पुरुष फ्रीस्टाईल कुस्ती 57 किलो वजनी गट) राहुल आवारे सुवर्ण
कुस्ती (महिला फ्रीस्टाईल कुस्ती 53 किलो वजनी गट) बबिता फोगट रौप्य
नेमबाजी (महिला 50 मीटर रायफल प्रोन) तेजस्विनी सावंत रौप्य
नेमबाजी (पुरुष डबल ट्रॅप) अंकुर मित्तल कांस्य
नेमबाजी (महिला डबल ट्रॅप) श्रेयसी सिंग सुवर्ण
नेमबाजी (पुरुष - 50 मीटर्स एअर पिस्टल) ओम मिथरवाल कांस्य
पॅरा-पॉवरलिफ्टिंग (हेवी वेट) सचिन चौधरी कांस्य
नेमबाजी (महिला - 25 मीटर रॅपिड पिस्टल) हीना सिद्धू सुवर्ण
बॅडमिंटन (मिश्र) सुवर्ण
टेबलटेनिस (पुरुष) सुवर्ण
नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर रायफल) मेहुली घोष रौप्य
नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर रायफल) अपूर्वी चंदेला कांस्य
नेमबाजी (पुरुष - 10 मीटर्स एअर पिस्टल) जितू राय सुवर्ण
नेमबाजी (पुरुष - 10 मीटर्स एअर पिस्टल) ओम मिथरवाल कांस्य
वेटलिफ्टिंग (पुरुष - 105 किलो वजनी गट) प्रदीप सिंग रौप्य
टेबल टेनिस (सांघिक) सुवर्ण
नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर पिस्टल) मनू भाकेर सुवर्ण
नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर पिस्टल) हीना सिद्धू रौप्य
नेमबाजी (पुरुष - 10 मीटर्स एअर रायफल) रवी कुमार कांस्य
वेटलिफ्टिंग (पुरुष - 94 किलो वजनी गट) विकास थालिया कांस्य
वेटलिफ्टिंग (महिला - 69 किलो वजनी गट) पूनम यादव (222 किलो वजन) सुवर्ण
वेटलिफ्टिंग (पुरुष - 85 किलो वजनी गट) आर वेंकट राहुल (338 किलो वजन) सुवर्ण
वेटलिफ्टिंग (पुरुष - 77 किलो वजनी गट) सतीश शिवलिंगम (317 किलो वजन) सुवर्ण
वेटलिफ्टिंग (महिला - 53 किलो वजनी गट) संजिता चानू (192 किलो वजन) सुवर्ण
वेटलिफ्टिंग (महिला - 48 किलो वजनी गट) मीराबाई चानू (196 किलो वजन) सुवर्ण
वेटलिफ्टिंग (पुरुष - 56 किलो वजनी गट) गुरुराजा (249 किलो वजन) रौप्य
वेटलिफ्टिंग (पुरुष - 69 किलो वजनी गट) दीपक लाथर (295 किलो वजन) कांस्य
गेल्या चार स्पर्धांमधील भारताची कामगिरी
भारतीय खेळाडूंची गेल्या चार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधली कामगिरीही लक्षवेधक ठरली होती. त्यामुळे यंदा गोल्ड कोस्टच्या समुद्रमंथनातूनही भारताला पदकांची मोठी अपेक्षा आहे.
2002... मॅन्चेस्टर... 69 पदकं, 2006... मेलबर्न... 50 पदकं, 2010... दिल्ली... 101 पदकं, 2014... ग्लास्गो... 64 पदकं अशी लयलूट भारताने केली आहे
संबंधित बातम्या :
CWG2018: सव्वा तासात 3 विजय, महाराष्ट्राचा राहुल आवारे अंतिम फेरीत!
CWG 2018 : महाराष्ट्रातील पदकविजेत्यांना सरकारकडून रोख इनाम
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून या देशाचे पाच खेळाडू बेपत्ता
CWG 2018 : श्रेयसीला सुवर्ण, अंकुर आणि ओमची कांस्यकमाई
CWG 2018 : हीना सिद्धूला सुवर्ण, यंदाच्या राष्ट्रकुलमध्ये दुसरं पदक
CWG 2018: भारतीय हॉकी संघाची सेमी फायनलमध्ये धडक
CWG 2018 : महिला-पुरुष नेमबाजीत एकाच दिवशी 4 पदकं
CWG 2018 : महिलांच्या सांघिक टेबल टेनिसमध्ये भारताला ‘सुवर्ण’
CWG 2018 : 16 वर्षांच्या मनूला नेमबाजीत सुवर्ण, हीनाला रौप्य
CWG 2018 : 69 किलो वजनी गटात पूनम यादवला सुवर्ण
CWG 2018 : 317 किलो वजन उचललं, सतीश शिवलिंगमला सुवर्ण
CWG 2018 : 18 वर्षांच्या दीपक लाथरला कांस्यपदक
CWG 2018 : संजिता चानूने 192 किलो वजन उचललं, भारताला दुसरं सुवर्ण
CWG 2018 : भारताला पहिलं गोल्ड, वेटलिफ्टर मीराबाई चानूला सुवर्ण
GC2018 : 249 किलो वजन उचललं, गुरुराजाला रौप्यपदक!
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेची नांदी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement