एक्स्प्लोर
Advertisement
युसूफ पठाण उत्तेजक चाचणीत दोषी, BCCIकडून निलंबनाची कारवाई
क्रिकेटर युसूफ पठाण गेल्या वर्षी मार्च महिन्यात झालेल्या उत्तेजक चाचणीत दोषी आढळला होता. त्यामुळं या प्रकरणात त्याला पाच महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं आहे.
मुंबई : टीम इंडियाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर युसूफ पठाण सध्या आहे कुठे आणि तो करतो काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर बीसीसीआयनं आज त्याचं उत्तर दिलं आहे. बडोद्याचा हा अष्टपैलू गेल्या वर्षी मार्च महिन्यात झालेल्या उत्तेजक चाचणीत दोषी आढळला होता. त्यामुळं या प्रकरणात त्याला पाच महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं आहे.
युसूफनं टर्ब्युटॅलिन या निषिद्ध द्रव्याचं अजाणतेपणी सेवन केल्याचं आढळून आलं होतं. खोकल्याच्या औषधात टर्ब्युटॅलिनचा वापर करण्यात येतो. या प्रकरणात युसूफवर गेल्या वर्षीच्या १५ ऑगस्टपासून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्याचं निलंबन येत्या १४ जानेवारीपर्यंत कायम राहिल.
डोपिंगपासून वाचण्यासाठी प्रत्येक खेळातील संघटना आता खेळाडूंना जागरुक करण्याचा प्रयत्न करते. पण युसूफ पठाणनं खोकल्याचं औषध अजाणतेपणी घेतल्यानं त्याला या कारवाईला सामोरं जावं लागलं. दरम्यान, युसूफनं याबाबतची आपली बाजू मांडल्यानंतर बीसीसीआयनं त्याच्यावर केवळ पाच महिन्यांच्या बंदीची कारवाई केली.
दरम्यान, डोपिंगबाबत खेळाडूंना आणखी माहिती देणं गरजेचं आहे हेच यानिमित्तानं समोर आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
विश्व
क्राईम
भारत
Advertisement