ICC WTC: जय शाहांच्या अध्यक्षतेखाली ICC मोठा निर्णय घेणार; WTC स्पर्धा आता नवीन स्वरुपात खेळवली जाणार
ICC On WTC: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत संघांची संख्या 9 वरून 12 पर्यंत वाढवण्याचा आयसीसीकडून विचार केला जातोय.

ICC On WTC: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत (WTC) संघांची संख्या 9 वरून 12 पर्यंत वाढवण्याचा आयसीसीकडून (ICC) विचार केला जातोय. सध्या सुरु असलेल्या 2025-2027 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत (WTC) 9 संघ सहभागी झाले आहेत. याआधीच्या स्पर्धेत देखील 9 संघांचाच समावेश होता. परंतु 2027 नंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत खेळणाऱ्या संघांची सख्या 12 पर्यंत वाढू शकते. यामुळे अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि आयर्लंड सारख्या संघांना अधिक कसोटी सामने खेळण्याची परवानगी मिळेल.
गेल्या वर्षभरापासून दोन-विभागीय स्वरूपावर चर्चा सुरू- (ICC On WTC 2027-2029)
गेल्या वर्षभरापासून दोन-विभागीय स्वरूपावर चर्चा सुरू आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, अलिकडच्या आयसीसी बैठकीत दोन-विभागीय स्वरूपावर चर्चा झाली, परंतु निधी मॉडेल आणि अव्वल संघांना या स्वरूपात खेळण्यासाठी मर्यादित संधी ही याची कारणे होती. न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू रॉजर ट्रज यांनी आयसीसीने स्थापन केलेल्या कार्यकारिणी समितीचे नेतृत्व केले. या बैठकीत संघ पदोन्नती प्रणालीवरही एकमत झाले. जर पहिल्या तीन संघांपैकी एक संघ दुसऱ्या विभागात गेला तर ते एकमेकांविरुद्ध खेळू शकणार नाहीत. हा मुद्दा ईसीबीचे सीईओ रिचर्ड थॉम्पसन यांनी ऑगस्टमध्ये उपस्थित केला होता.
WTC likely to expand to 12 teams from 2027. (Espncricinfo). pic.twitter.com/aDJKi0DFHt
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 11, 2025
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 12 संघांचा समावेश करण्याचा निर्णय सकारात्मक- (WTC 2027-2029)
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 12 संघांचा समावेश करण्याचा निर्णय सकारात्मक असू शकतो. सर्व 12 संघांना संपूर्ण जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ठराविक संख्येने सामने खेळावे लागतील. तथापि, सामना आयोजित करणाऱ्या देशाला कोणताही अतिरिक्त निधी दिला जाणार नाही. तीन प्रमुख देशांकडून निधीचे विकेंद्रीकरण अद्याप सुरू झालेले नसले तरी, अफगाणिस्तान आणि आयर्लंडसारखे देश जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ठराविक संख्येने कसोटी सामने खेळू शकतील. वृत्तानुसार, आयसीसीच्या एका बोर्ड संचालकाने सांगितले की या मॉडेलमुळे प्रत्येक देशाला कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळेल.





















