IND vs NZ Live Streaming : न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारत सज्ज, कधी कुठं पाहाल सामना?
IND vs NZ : टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे.
India vs New Zealand Match Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सद्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात प्रत्येकी तीन टी-20 आणि एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. यातील टी20 मालिकेत भारतानं एक सामना जिंकला असून दोन सामने अनिर्णीत राहिल्याने मालिका भारताने जिंकली. ज्यानंतर आजपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे.
शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) आजपासून अर्थात 25 नोव्हेंबरपासून एकदिवसीय मालिकेला (IND vs NZ ODI Series) सुरुवात करणार आहे. या सामन्याद्वारे भारत 2023 मध्ये खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठीचा (ODI World Cup 2023) सराव सुरु करेल. या 50 षटकांच्या विश्वचषकासाठी भारत अधिकाधिक वन डे खेळणार आहे. ज्याची सुरुवात आजपासून होत आहे. तर आज होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्याबद्दलची माहिती जाणून घेऊ...
कधी होणार सामना?
भारतीय वेळेनुसार आजचा भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना सकाळी 7 वाजता खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे.
कुठे आहे सामना?
आजचा हा भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला एकदिवसीय सामना टी20 सामना ऑकलँड एडन पार्क क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर होणार आहे. तसेच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
वन डे मालिकेसाठी कसा आहे भारतीय संघ?
शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, शहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपक चाहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 25 नोव्हेंबर | ऑकलँड |
दुसरा एकदिवसीय सामना | 27 नोव्हेंबर | हेमिल्टन |
तिसरा एकदिवसीय सामना | 30 नोव्हेंबर | क्राइस्टचर्च |
हे देखील वाचा-