एक्स्प्लोर
Rohit Sharma : पराभवाचा 'चौकार'! लाजिरवाण्या यादीत रोहित शर्माचं नाव
रविवारी (8 डिसेंबर) ॲडलेडमध्ये संघाचा 10 गडी राखून पराभव झाल्यानंतर रोहितने भारतीय कर्णधार म्हणून सलग चौथा कसोटी सामना गमावला.
Rohit Sharma
1/7

रविवारी (8 डिसेंबर) ॲडलेडमध्ये संघाचा 10 गडी राखून पराभव झाल्यानंतर रोहितने भारतीय कर्णधार म्हणून सलग चौथा कसोटी सामना गमावला.
2/7

टीम इंडियाने पर्थमधील पहिला कसोटी सामना जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्या सामन्यात रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहने कर्णधारपद भूषवले होते. आता ऑस्ट्रेलियाने दुसरी कसोटी जिंकून 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
3/7

ऑस्ट्रेलियात येण्यापूर्वी रोहितने न्यूझीलंडविरुद्ध त्याच्या नेतृत्वाखाली सलग तीन सामने गमावले होते. आता ॲडलेडमधील पराभवाने हा क्रम पुढे नेला आहे.
4/7

कसोटीत सलग 4 किंवा त्यापेक्षा जास्त सामने गमावलेल्या भारतीय कर्णधारांच्या यादीत तो सामील झाला. असे अनेक भारतीय कर्णधार आहेत ज्यांनी सलग चार कसोटी सामने गमावले आहेत.
5/7

रोहितने या बाबतीत माजी कर्णधार विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि दत्ता गायकवाड यांची बरोबरी केली आहे. या तिघांच्या नेतृत्वाखालीही टीम इंडियाने सलग 4 सामने गमावले होते. यापैकी धोनीच्या कार्यकाळात असे दोनदा घडले.
6/7

सलग 4 किंवा त्याहून अधिक कसोटी सामने गमावलेले भारतीय कर्णधार मंसूर अली खान पतौडी (1967-68) आहे, त्याने 6 सलग सामने हारले आहेत. त्यानंतर सचिन तेंडुलकर (1999-00) पाच सामने हारले.
7/7

दत्ता गायकवाड (1959), महेंद्रसिंग धोनी (2011), महेंद्रसिंग धोनी (2014), विराट कोहली (2020-21) यांनी 4 चार सामने हारले आहेत. आता या यादीत रोहित शर्मा पण आला आहे.
Published at : 08 Dec 2024 04:49 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
पुणे






















