Kalyan : 58 बेकायदेशीर इमारतींवर कारवाई; बिल्डरकडून फसवणूक, रहिवाशांना मनस्ताप Special Report
कल्याण डोंबिवलीतील ५८ अनधिकृत प्रकल्पांवर पाडकामाची कारवाई लवकरच सुरु करण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या तीन महिन्यांमध्ये सर्व प्रकल्पांवरील पाडकाम प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आतापर्यंत ५८ पैकी सहा इमारती पूर्णतः निष्कासित करण्यात आल्या आहेत...पाहूयात हा खास रिपोर्ट...
कल्याण डोंबिवलीतील ५८ बेकायदेशीर प्रकल्पांवर पाडकाम कार्यवाही लवकरच सुरू होणार पाणी आणि वीज पुरवठा खंडित करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या कारवाईदरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त लागणार असल्याने संबंधित पोलीस ठाण्यांना पत्रव्यवहार सुरू आहे.
जवळपास सहा हजार रहिवाशांचा प्रश्न
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी) हद्दीत बनावट कागदपत्रांवर उभारण्यात आलेल्या ५८ बेकायदेशीर प्रकल्पांवर लवकरच निष्कासनाची कार्यवाही करण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, येत्या तीन महिन्यांत या सर्व प्रकल्पांवरील पाडकाम प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी माहिती दिली की, याप्रकरणी महापालिकेने इमारती रिकाम्या करण्यासाठी संबंधित रहिवाशांना अंतिम नोटीसा बजावल्या आहेत. त्याचबरोबर पाणी आणि वीज पुरवठा खंडित करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या कारवाईदरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त लागणार असल्याने संबंधित पोलीस ठाण्यांना पत्रव्यवहार सुरू आहे.
संबंधित प्रभाग क्षेत्र कार्यालयांनी या ५८ प्रकल्पांवरील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. यापैकी ६ इमारती पूर्णतः निष्कासित करण्यात आल्या आहेत, तर ४ इमारतींवर अंशतः कारवाई करण्यात आली आहे.
उर्वरित इमारतींमध्ये आजही रहिवासी वास्तव्य करत आहेत. त्यांना इमारती रिकाम्या करण्यासाठी नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेसह पावसाळ्याच्या कालावधीत कारवाईत खंड पडला. १९ नोव्हेंबर २०२४ रोजी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, बेकायदेशीर इमारती निष्कासित करून महापालिकेने यासंबंधित अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेने या प्रकरणातील सर्व बेकायदेशीर इमारतींच्या रहिवाशांना सुसूत्रपणे सूचना देऊन कार्यवाहीचे नियोजन केले आहे. आगामी कालावधीत या इमारतींवर महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात येणार आहे.
सगळे कार्यक्रम






























